Voice of Eastern
मनोरंजन

गायत्री दातार रिलेशनशिपमध्ये?

banner

मुंबई 

अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेला ‘बिग बॉस’ सिझन ३ अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून ‘तुला पाहते रे’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या गायत्री दातारचाही यात समावेश आहे. गायत्री या घरात आता बऱ्यापैकी रुळली असून तिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे गायत्री सध्या प्रेमात पडली आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल गायत्री कोणाच्या प्रेमात पडली आहे? तिच्या प्रियकराचे नाव ऐकाल तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. खुद्द बिग बॉस हे तिचे प्रियकर आहेत. बसला ना आश्चर्याचा धक्का? परंतु ही गोष्ट खरी आहे. सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओच्या माध्यमातून याचा खुलासा झाला आहे. या व्हिडिओमध्ये ती आपल्या प्रियकराबरोबर प्रेमाच्या गोष्टी करताना दिसत आहे. बिग बॉससमोर ती चक्क लाजतेय, त्यांच्यावर रुसतेय. आता गायत्रीचा प्रियकर तिचा हा प्रस्ताव मान्य करणार का, हे पाहण्याची सगळ्यांना उत्सुकता आहे.

Related posts

‘विक्रम वेधा’चे मनोरंजक पोस्टर प्रदर्शित

गायिका श्रुती रायचं ‘मन का शोधते…’ गाणं प्रदर्शित

Voice of Eastern

‘गडद अंधार’चे संगीत व ट्रेलर रसिकांच्या भेटीला

Leave a Comment