Voice of Eastern

मुंबई

स्ट्रोक हे भारतातील मृत्यूचे तिसरे प्रमुख कारण आहे, जेथे न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरच्या घटना अलिकडच्या काळात दुपटीने वाढत  आहेत. इंडियन स्ट्रोक असोसिएशनच्या मते, गेल्या काही दशकांमध्ये स्ट्रोकच्या घटनांमध्ये जवळपास 100% वाढ झाली आहे. महिलांपेक्षा पुरुषांमध्ये स्ट्रोकचे प्रमाण जास्त असल्याने, बैठी जीवनशैली, अनियंत्रित रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा, हृदयविकार आणि तणाव यासारख्या अनेक जीवनशैली घटकांना तज्ञ या वाढीचे कारण म्हणत आहेत, जे सध्या व्यस्त जीवनशैलीचा व त्यांचे ब्रीदवाक्य- ‘कर्तव्य प्रथम येते’ याचे विचार करून पोलिस दलात कमालीचे वाढताना दिसत आहे. महामारीच्या काळात, सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेल्या या शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिस विभागाच्या अतुलनीय प्रयत्नांमुळे पोलिस कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर मोठा परिणाम झाला, ज्यामुळे त्यांना स्ट्रोकचा धोका अधिक वाढला. स्ट्रोक व्यवस्थापनाविषयी तपशीलवार दृष्टीकोन प्रदान करण्याची गरज लक्षात घेऊन, ग्लोबल हॉस्पिटल, परळ, मुंबई ने जागतिक स्ट्रोक दिनानिमित्त “#NoStrokeForMe” मोहीम लॉन्च केली आहे.

 

“#NoStrokeForMe” च्या मोहिमेचा शुभारंभ

विश्वास नांगरे पाटील, जॉईंट कमिश्नर ऑफ पोलीस (कायदा व सुव्यवस्था) हे प्रमुख पाहुणे म्हणून आणि प्रसिद्ध मराठी अभिनेते श्री अशोक सराफ हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. डॉ.शिरीष हस्तक ,पश्चिम भारतातील स्ट्रोक युनिट स्थापित करणारे पहिले डॉक्टर आणि ऍडवान्स्ड इंटरव्हेंशनल न्यूरोलॉजीमधील आपल्या कौशल्यासाठी जाणले जाणारे शहरातील टॉप 3 डॉक्टर्समध्ये डॉ. नितीन डांगे यांनी पोलिस दलाला संबोधित केले, ज्यात त्यांनी स्ट्रोकवर जागरूकता निर्माण करण्याच्या महत्त्वावर प्रकाश टाकत जीव वाचवण्यासाठी साडेचार तासांची विंडो पिरियड, निवडक स्ट्रोकच्या रूग्णांमध्ये २४ तासांचा वाढीव विंडो पिरियड आणि स्ट्रोकने ग्रस्त असलेल्या रूग्णाचे अपंगत्व टाळण्यासाठी इतर पावले याचे महत्त्व सांगितले. जागतिक स्ट्रोक दिन, २९ ऑक्टोबर रोजी जगभरात साजरा केला जातो, याचा एक भाग म्हणून ग्लोबल हॉस्पिटल, परळ, मुंबई ने स्ट्रोकचे गंभीर स्वरूप आणि उच्च दरांवर जोर देण्यासाठी, या आजाराच्या प्रतिबंध आणि उपचारांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि सर्वायवर्ससाठी अधिक चांगली काळजी आणि समर्थन सुनिश्चित करण्यासाठी जनजागृती मोहिमेचे आयोजन केले होते.

रुग्णालयाने रिअल लाईफ हिरोझ चाही सत्कार केला ज्यांनी आपल्या प्रियजनांना वेळेवर आणले आणि स्ट्रोकसाठी विंडो पिरियड लक्षात ठेवले. डॉ. शिरीष हस्तक, रिजनल डायरेक्टर न्यूरोलॉजी, स्ट्रोक आणि क्रिटिकल केअर, ग्लोबल हॉस्पिटल, परळ, मुंबई म्हणाले, “मानवी शरीरात स्ट्रोक तेव्हा येतो जेव्हा रक्त आणि ऑक्सिजनचा पुरवठा खंडित होतो आणि म्हणूनच तो वेळ संवेदनशील असतो. आजच्या कार्यक्रमात, आम्‍ही स्‍ट्रोकच्‍या रूग्‍णांचे कुटुंबीय आणि काळजी घेणाऱ्यांचा सत्कार केला, ज्यांनी लक्षणे ओळखून त्यांना वेळेत रुग्णालयात नेले आणि त्यांच्यावर योग्य वेळी प्रभावी उपचार केले जातील याची खात्री करून घेतली. वेळेवर कारवाई केल्याने विविध वयोगटातील रुग्णांचे प्राण वाचविण्यात मदत झाली.”

 

डॉ. नितीन डांगे, सिनियर कंसल्टंट न्यूरोसर्जन म्हणाले, “मेकॅनिकल थ्रोम्बेक्टॉमी आज स्ट्रोकच्या रूग्णांसाठी वरदान ठरली आहे कारण याने स्ट्रोकच्या निवडक रूग्णांमध्ये विंडो पिरियड साडेचार तासांवरून २४ तासांपर्यंत वाढवला आहे. आज या कार्यक्रमात आपण हे स्ट्रोकचे रुग्ण चांगले आरोग्यात असताना व त्यांचे अनुभव सामायिक करताना पाहत आहोत जे न्यूरोसायन्समधील प्रगतीच्या यशाची अंतिम साक्ष आहे.”

पोलिसांना स्ट्रोक होण्याची अधिक शक्यता आहे कारण त्यांच्यापैकी बहुतेक लोकं उच्च रक्तदाब, मधुमेह, कोलेस्ट्रॉल आणि तणाव या जीवनशैलीच्या विकारांनी ग्रासले आहेत. जेव्हा एखाद्या पोलिस अधिकाऱ्याला स्ट्रोक येतो आणि तो अपंग होतो, तेव्हा त्याचा रोजगार धोक्यात येतो ज्याचा थेट परिणाम घरातील दैनंदिन खर्चापासून ते घरातील मुलांच्या शिक्षणापर्यंत सर्व गोष्टींवर होतो. ग्लोबल हॉस्पिटल, परळ, मुंबई ने जनजागृतीसाठी एक कार्यक्रम सुरू केला आहे आणि त्याची सुरुवात पोलिस विभागाकडून करण्यात आली आहे, याचे मी कौतुक करतो. मला आशा आहे की आज डॉक्टरांनी जे काही बोलले आहे ते येथे उपस्थित असलेल्या आणि ऑनलाइन कार्यक्रम पाहणाऱ्या पोलिस दलात आत्मसात केले जाईल. जागरूकता पसरवा #NoStrokeForMe” असे मत विश्वास नांगरे पाटील यांनी व्यक्त केले.

 

या महामारीमुळे चित्रपट उद्योगाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे, मी ग्लोबल हॉस्पिटल स्ट्रोकबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची कौतुक करतो आणि त्याशिवाय प्रतिबंधात्मक मुद्दे  आणि  BE FAST हेच मी माझ्यासोबत घेऊन जाईन व सगळ्यांना याबाबत शिक्षित करेन. जर तुम्ही स्ट्रोक टाळू शकलात तर तुम्ही स्वतःला या विकारापासून वाचवाल आणि जर तुम्ही वेळीच ओळखले तर तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीचा जीव वाचवाल.

– अशोक सराफ, मराठी अभिनेते

Related posts

महाराष्ट्र प्राध्यापक सेनेतर्फे आभासी पध्दतीने छत्रपती शिवरायांची जयंती उत्साहात साजरी…

‘चला या …मा. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल समजून घेऊया’; राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोहीमेला सुरुवात

गोवानिर्मित ७५ लाखांचे विदेशी मद्य जप्त; तीन जणांना अटक

Leave a Comment