Voice of Eastern

मुंबई :

मुंबईमध्ये काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात गाड्यांच्या सायलेन्सर चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गाडीच्या चोरण्यात येत असलेल्या सायलेन्सरची काळ्या बाजारात विक्री होत असेल, असे आपल्याला वाटत असेल. पण तसे नाही. इको गाडीच्या सायलेन्सरमधून चक्क सोने मिळत असल्याचे धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.

अंधेरीमध्ये राहणार्‍या एका व्यक्तीच्या इको गाडीचे चार महिन्यांपूर्वी चोरट्यांकडून सायलेन्सरची चोरी करण्यात आली होती. या प्रकरणी त्यांनी अंधेरी पोलिस ठाण्यात तक्रार केली. याप्रकरणी गुन्हा नोंद होताच पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला. आरोपीचा शोध सुरु असताना पोलिसांनी सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन तेजस पोतदार याला चौकशीसाठी ताब्यात घेतलेे. चौकशीत त्यानेच सायलेन्सर चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून चोरीचे सायलेन्सर जप्त केले. तपासात या गुन्ह्यांत त्याचे इतर काही सहकार्‍यांची नावे समोर आली आहे. त्यांचा आता पोलीस शोध घेत आहेत. मात्र तेजसच्या चौकशीत समोर आलेल्या माहितीने पोलिसच हादरले आहेत. इको गाडीच्या सायलेन्सरमधून विशिष्ट प्रकारची माती मिळते. चोरांकडून या मातीसाठीच हे सायलेन्सर चोरण्यात येत आहेत. चोरी केलेल्या सायलेन्सरमधील माती वितळवून त्यापासून सोने तयार होते. साधारणपणे एका सायलेन्सरमधून एक किलो माती बाहेर येते. गेल्या काही वर्षांत अशा प्रकारे सायलेन्सर चोरी करणार्‍या अनेक टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. गेल्या वर्षी कांदिवली पोलिसांनी तीन आरोपींना अटक करुन एका टोळीचा पर्दाफाश केला होता. त्यानंतर प्रॉपटी सेलच्या अधिकार्‍यांनी पाच आरोपींना अटक केली होती. त्यांच्या अटकेनेच सायलेन्सरच्या मातीतून सोने तयार होत असल्याचे उघडकीस आले होते.

Related posts

इयत्ता दहावी-बारावी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर

विद्यार्थ्यांच्या उपोषणाची पाच दिवसांने घेतली दखल; उदय सामंत यांनी दिले बैठकीचे आश्वासन

Voice of Eastern

जीएसबी डी बी सेवा मंडळातील देवीचे हे मनमोहक रूप

Leave a Comment