Voice of Eastern

मुंबई :

सेंट झेवियर महाविद्यालयातील इंडियन म्युझिक ग्रुपला यावर्षी ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. तसेच २०२४ हे जॅनफेस्टचे ५० वे वर्ष आहे. त्यामुळे जॅनफेस्टच्या सुवर्ण महोत्सवाची तयारीसाठी महाविद्यालयाचे विद्यार्थी सज्ज झाले असून, त्यांचा उत्साहा ओसंडून वाहत आहे. हा अविस्मरणीय सोहळा अनुभवण्यासाठी आता फक्त ५० दिवस बाकी आहेत.

जॅनफेस्ट संगीतप्रेमी आणि रसिक श्रोत्यांसाठी कायम एक पर्वणी ठरलेला उत्सव म्हणता येईल. विशेष म्हणजे जॅनफेस्टचे नियोजन पूर्णपणे विद्यार्थी करतात. यावर्षी जॅनफेस्ट २५ व २६ जानेवारी रोजी आयोजित केला आहे. २५ जानेवारीला सायंकाळी तर २६ जानेवारीला सकाळ व सायंकाळ अशा दोन सत्रात कार्यक्रम होणार आहे. यामध्ये दिग्गज कलाकार त्यांच्या गायन-वादनाच्या विशेष शैलीने प्रेक्षकांचे मन वेधून घेणार आहेत. इंडियन म्युझिक ग्रुपची खासियतच आहे की येथे सुरांच्या संगमासोबत शास्त्रीय संगीत कलेचा आणि संगीतप्रेमींचा एक अनोखा मेळ बसतो. जनफेस्टने यापूर्वी अनेक प्रतिभाशाली कलाकारांच्या कलेचा साक्षीदार राहिला आहे. जॅनफेस्ट २४ च्या निमित्ताने पद्मविभूषण आणि पद्मभूषण पुरस्काराने पुरस्कृत कलाकार तसेच काही असे कलाकार ज्यांच्या संगीताच्या प्रवासाची सुरुवात या महाविद्यालयामध्ये झाली.

७ जानेवारी २०२४ रोजी आयएमजीचा ‘बर्थडे कॉन्सर्ट’ साजरा केला जाईल. शास्त्रीय संगीत तुमच्या मनाला भावत असेल आणि तुम्ही भारतीय कलेला जपणाऱ्या किंवा जोपासणाऱ्यांपैकी एक असाल, तर आवर्जून एक उत्तम श्रोता होऊन, वेळातवेळ काढून ह्या अभूतपूर्व सोहळ्याचा भाग व्हा, असे आवाहन सेंट झेवियर्स महाविद्यालयाकडून करण्यात आले आहे.

Related posts

मुंबई विद्यापीठाच्या प्रभारी प्र- कुलगुरूपदी डॉ. अजय भामरे

हिंदी महासागरात सागरी उष्णता वाढल्याचा मान्सूनवर परिणाम

अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा द राईज’चे हिंदी व्हर्जन या तारखेला येणार ओटीटी प्लॅटफॉर्मवर

Leave a Comment