Voice of Eastern
ताज्या बातम्यामोठी बातमीशहर

खुशखबर; रेल्वे प्रवाशांना आता प्रवासात मिळणार ब्लँकेट, चादरी

banner

मुंबई :

कोरोना प्रादुर्भावामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये प्रवाशांना देण्यात येणार्‍या ब्लँकेट, चादरींवर बंदी घालण्यात आली होती. आता कोरोना आटोक्यात आल्याने रेल्वे दोन वर्षांनंतर ही बंदी हटवण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात रेल्वे बोर्डाने सर्व विभागीय रेल्वे मंडळांना आदेश दिल्याने प्रवाशांना रेल्वे प्रवासात बेडरोल मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

कोरोनामध्ये खबरदारी म्हणून प्रवाशांना रेल्वे प्रशासनाकडून देण्यात येणारे बेडरोल व ब्लँकेट बंद करत त्यांना प्रवासात स्वत:चे ब्लँकेट आणण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्याने सर्व गाड्या नियमित धावू लागल्या आहेत. त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील प्रवाशांकडून बेडरोल आणि ब्लँकेटची सुविधा पुरवण्याची मागणी होऊ लागली होती. याच पार्श्वभूमीवर रेल्वे महामंडळाने बेडरोलवरील बंदी हटवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भातील पत्र रेल्वेच्या सर्व विभागांना पाठवण्यात आले आहे.

प्रवाशांना पुरवण्यात येणार्‍या बेडरोलची किंमत ३०० रुपये असून, त्यामधील वस्तू प्रवाशांना आपल्या सोयीनुसार घेण्याची सोय असणार आहे. ब्लँकेट १८०, बेडशीट ३५, कव्हर शीट ४० आणि कव्हरसह उशीसाठी ७० रुपये प्रवाशांना मोजावे लागणार आहेत. त्याचबरोबर प्रवाशांना डिस्पोजेबल बेडरोल पुरवण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली.

Related posts

‘माझी मुंबई स्वच्छ मुंबई’ अभियानाला गती; घाटकोपर रेल्वे स्थानकावर आयटीआयच्या विद्यार्थ्यांकडून स्वच्छता अभियान

मुंबई-गोवा महामार्गाचे नाव स्वराज्य भूमी कोकण महामार्ग करावे – कोकणवासीयांची मागणी

राज्यातील ५० अनाथ मुलांचे स्वनाथ फाउंडेशन घेणार प्रतिपालकत्व – मंगलप्रभात लोढा

Leave a Comment