Voice of Eastern
ताज्या बातम्यामोठी बातमीशहर

खुशखबर : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुंबईकरांच्या सेवेत आणखी दोन मेट्रो मार्ग

banner

मुंबई :

मुंबईकरांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा यासाठी शहरात मोठ्या प्रमाणात मेट्रो रेल्वेचे काम सुरू आहे. त्यातीलच मुंबई मेट्रो ७ आणि मेट्रो २ या दोन मार्गिका गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नागरिकांसाठी खुल्या करण्यात येणार आहे. त्यामुळे पश्चिम उपनगरातील अंधेरी ते दहिसर आणि डीएन नगर ते दहिसर या भागातील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

मेट्रो ७ – अंधेरी (पूर्व) ते दहिसर आणि मेट्रो २ अ – डीएनए नगर ते दहिसर हे दोन्ही मेट्रो मार्गांच्या कामाचे भूमिपूजन ऑक्टोबर २०१५ ला झाले, तर प्रत्यक्ष कामाला २०१६ मध्ये सुरुवात झाली. कोरोनाचा फटका या मार्गांना बसला होता. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच या दोन मार्गांचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आले. दोन्ही मार्गांची सीएमआरएसच्या पथकाकडून झालेल्या यशस्वी सुरक्षा चाचणीनंतर सीएमआरएसने सुरक्षा प्रमाणपत्र दिले.
डीएनए नगर ते दहिसरपर्यत असलेला मेट्रो- २ अ हा मार्ग १८.५ किलोमीटर लांब आहे. यामध्ये आनंदनगर, ऋषी संकुल, आयसी कॉलनी, एकसर, डॉन बॉस्को, शिंपोली, महावीर नगर, चारकोप, मालाड मेट्रो, कस्तुरी पार्कसह एकूण १६ स्थानके आहेत.

अंधेरी- पूर्व ते दहिसरपर्यत असलेल्या मेट्रो ७ चा मार्ग १६.४७ किलोमीटर इतका आहे. यामध्ये दहिसर पूर्व ओवरीपाडा, नॅशनल पार्क, देवीपाडा, मागाठाणे, महिंद्रा अँड महिंद्रा, बाणडोंगरी, पुष्पा पार्क, पठाणवाडी, आरे, महानंद, जेव्हीएलआर जंक्शन, शंकरवाडी, अंधेरी पूर्व अशी १३ स्थानके आहेत.

Related posts

भारतीय केळी आणि बेबीकॉर्न यांचा कॅनडाच्या बाजारपेठेत प्रवेश

Voice of Eastern

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त चैत्यभूमीवर नियोजन करा

Voice of Eastern

जुनिअर राष्ट्रीय कॅरम – महाराष्ट्राच्या मुला – मुलींची अंतिम फेरीत धडक 

Voice of Eastern

Leave a Comment