मुंबई :
राज्यात हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि या पार्श्वभूमीवर आपल्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी विविध संघटना मुंबईच्या वेशीवर धडकले आहेत. शासकीय सेवेत 2005 पासून दाखल होणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन बंद करण्यात आले आहे. त्यामुळे हजारो शासकीय सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन मिळणार नसल्याने वृद्धपकाळात संकटांना सामोरे जाण्याची वेळ येऊ नये यासाठी पेन्शनर संघटनेच्या वतीने विधानपरिषदेवर ती मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे, मात्र या मोर्चाला मुलुंड जकात नाका येथे अडवण्यात आले आहे. त्यांची समजूत काढण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहे. मात्र कर्मचारी आक्रमक पवित्र्यात आहेत.
शासनाने या कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडू नये अशी मागणी या आंदोलनकर्त्यांच्या समितीचे समन्वयक वितेश खांडेकर यांनी केली आहे. आता पर्यंत चार हजार कर्मचाऱ्यांचे निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्याचा रोष विविध शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये असल्याने त्याला न्याय मागण्यासाठी निर्वाणीचा लढा विधिमंडळावर लॉन्गमार्च काढला असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे.
जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी यासाठी, विधानभवनावर शासकीय कर्मचाऱ्यांनी पाळी पेन्शन मार्च आयोजित केला आहे भिवंडी पासून निघालेला हा मोर्चा काल रात्री मुंबईचा प्रवेशद्वार असलेल्या आनंद नगर टोल नाका येथे पोहोचला या ठिकाणी पोलिसांनी हा मोर्चा अडविला आहे. आज सकाळी हे आंदोलक विधी मंडळाकडे कूच करणार आहे त्यांना या ठिकाणी स्वत थांबवण्यात आले आहे पोलीस या आंदोलकांना बस ने आझाद मैदानाकडे मुंबई घेऊन जाण्यास तयार आहे परंतु आंदोलक मात्र पाई जाण्यावर ठाम आहे या आंदोलकांना भेट देण्यासाठी पदवीधर मतदारसंघाचे आमदार अभिजित वंजारी हे सुद्धा आले होते.