मुंबई :
वाढती बेरोजगारी आणि कायद्याचे शिक्षण घेतल्यास हमखास उत्पनाची संधी यामुळे गेल्या काही वर्षांपासून कायद्याचे शिक्षण घेण्याकडे तरुणाईचा ओढा वाढत आहे. यंदा एलएलबी तीन वर्ष अभ्यासक्रमासाठी ४६ हजार १६७ अर्ज आले. गतवर्षीच्या तुलनेत यंदा अधिक वाढ झाली आहे.
रोजगाराची हमखास संधी आणि कायद्याच्या पदवीमुळे समाजात मिळणार वकील म्हणून सन्मान, तसेच तरुणांमध्ये कायद्याबाबत निर्माण होत असलेली जागरूकता यामुळे एलएलबीचे शिक्षण घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. गतवर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे विद्यार्थ्यांची नोंदणी कमी झाली होती. गतवर्षी एलएलबी तीन वर्ष अभ्यासक्रमासाठी ४० हजार ३५४ अर्ज आले होते. मात्र यंदा सुमारे ६ हजारांनी अर्जामध्ये वाढ झाली आहे. यावर्षी ४६ हजार १६७ अर्ज आले होते. त्यापैकी प्रवेशात ४२ हजार ९३८ विद्यार्थ्यांनी भाग घेतला आहे. तर पहिल्या फेरीसाठी ४१ हजार विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरल्याचे सीईटी सेलकडून सांगण्यात आले.