Voice of Eastern

मुंबई :

संक्रांत या सणाचे औचित्य साधत सूर्यवंशी हा चित्रपट शुक्रवारी गुजरातमध्ये पुन्हा प्रदर्शित करण्यात आला. ३० नॉन नॅशनल मल्टिप्लेक्स चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्यात आला.

गुजरातमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोणता चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे खेचून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास प्रदर्शनकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. सूर्यवंशी चित्रपटाने यापूर्वी एकटा गुजरातमधून ४२ कोटींचा गल्ला बॉक्स ऑफिसवर जमवला होता. त्यामुळे हा चित्रपट पुन्हा एकदा गुजरातवासीयांचे मनोरंजन करून त्यांना चित्रपटगृहाकडे परत आणण्यात यशस्वी ठरेल असा विश्वास प्रदर्शनकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

रोहित शेट्टी दिग्दर्शित अक्षय कुमार आणि कॅटरिना कैफ यांच्या सूर्यवंशी या चित्रपटाला ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. हा चित्रपट अनेकांच्या पसंतीस उतरला आहे. ओटीपी ओटीटी प्लॅटफॉर्मबरोबरच या चित्रपटाने सिनेमागृहमध्येही जबरदस्त कमाई केली आहे.

Related posts

मुंबई, नवी मुंबईवरील ताण कमी करण्यासाठी स्मार्ट सिटी उभारणार – नितीन गडकरी

राज्यात एच३ एन२ च्या रुग्णांमध्ये वाढ!

मुंबईत २७ जूनपासून १० टक्के पाणीकपात

Leave a Comment