महाड :
महाड तालुका आणि ग्रामीण भागात बेकायदेशीर गुटख्याची विक्री केली जात असल्याची माहिती महाड पोलिसांना मिळाली होती. महाड उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली महाड शहर आणि बिरवाडी परिसरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मारलेल्या छाप्यात सुमारे आठ लाख रुपयाचा गुटका जप्त करण्यात यात आला. त्याच बरोबर चार गुटका माफियांवर कारवाई करण्यात येऊन येऊन त्यांना अटक करण्यात आली आहे. महाड पोलिसांनी मी तंबाखूजन्य प्रतिबंधित पदार्थाची विक्री करणार्यांवर कारवाई करण्याची धडक मोहीम सुरू केली.
महाड तालुक्यात गुटख्याची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते त्याच प्रमाणे खुलेआम काही दुकानातून विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारे शहरात तसेच बिरवाडी मध्ये पोलिसांनी शनिवारी दुपारनंतर धडक कारवाई करून सुमारे आठ लाख रुपयाचा गुटका जप्त केला, सर्वात आश्चर्य असे की बहुतांशी साठा हा कापड दुकान आणि किराणा मालाच्या दुकानात आढळून आला, या कारवाईमध्ये चार गुटका माफियांना पोलिसांनी अटक केली आहे.
शनिवारी दुपारी पोलिसांनी बिरवाडीतील निलेश जीवन मोरे (४६) याच्या दुकानातून १ लाख ४७ हजार ४० रुपये किमतीचा गुटका जप्त केला त्यानंतर महाड शहरातील जुना पोस्ट, सरेकर आळी या विभागात कारवाई करण्यात आली. शहरात मध्यवर्ती वस्तीमध्ये खुलेआम गुटख्याची बेकायदेशीर विक्री होत असल्याचे उघड झाले. जुना पोस्ट या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या रमेश नथूराम माळी (४०) यांच्या कापड दुकानातून गुटका विक्री केली जात होती. त्यानंतर जवळच असलेल्या राजेश जयंत थरवळ यांच्या दुकानावर छापा मारून गुटख्याचा साठा जप्त केला तसेच शहरातील सरेकर आळी परिसरातील समीर वसंत पारेख (४७) यांच्या दुकानाच्या मागील भागात असलेल्या बंद खोलीतून गुटख्याची पाकिटे जप्त करण्यात आली. महाड शहरातून पोलिसांनी ६ लाख ५७ हजार रुपये किमतीचा गुटका जप्त केला. पोलिसांनी रमेश माळी राजेश थरवळ आणि समीर पारेख या तिघांना महाड मधून अटक केली तर निलेश मोरे याला बिरवाडीतून अटक केली. महाड उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक खोपडे आणि एम आय डी सी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आंधळे पुढील तपास करीत आहेत.