Voice of Eastern

मुंबई :

समर्पित वृत्तीने कामगारांच्या सर्वांगिण विकासासाठी व कामगारांचे जीवनमान उंचविण्यासाठी सेवाभावी वृत्तीने आणि सातत्याने कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य गुणवंत कामगार कल्याण मंडळ यांनी कामगार क्षेत्रातील सर्वोच्च मानाचा “कामगार मित्र” पुरस्कार संस्थापक अध्यक्षा डॉ. भारती चव्हाण, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण यांच्या हस्ते ५ मे रोजी देवून हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळाला गौरविण्यात आले आहे.

कामगार मित्र पुरस्काराचे स्मृतीचिन्ह आणि मानपत्र हे मान्यवरांच्या हस्ते हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळाच्या वतीने कामगार कल्याण अधिकारी व जनसंपर्क अधिकारी अमित आबासाहेब डोंगरे, व्यवस्थापक पिंपरी विभाग डॉ. बाबासाहेब कुऱ्हे, गुणवंत कामगार कृष्णा ढोकळे, गुणवंत कामगार किरण जाधव, बाबासाहेब शिंदे, सीताराम जाधव, गोरखनाथ बंडगर यांनी स्वीकारले.

या पूर्वीदेखील महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाने कामगार क्षेत्रातील सर्वोच्च मानाचा “रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे कामगार मित्र” पुरस्काराचे स्मृतीचिन्ह, मानपत्र, रुपये ७५ हजार रुपयांचा धनादेश आणि मेडल देवून कामगार मंत्री हसन मुश्रीफ आणि राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या हस्ते १९ एप्रिल २०२२ रोजी देवून हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळाला गौरविले आहे.

महामंडळातील कामगारांना मिळणाऱ्या कल्याण सुविधा :

 • हाफकिन महामंडळातील कामगारांकरिता भारत सरकारच्या श्रम व रोजगार मंत्रालयाच्या राष्ट्रीय श्रमिक शिक्षा एवं विकास बोर्ड अंतर्गत कामगारांचा बौद्धिक आणि व्यक्तिगत विकास व्हावा आणि त्यांच्यातील कौशल्य विकसित व्हावे या उद्देशाने  कामगारांकरिता ४५ दिवसांचे “कामगार प्रशिक्षण वर्ग” कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
 • मुंबई आणि पुणे येथे कामगारांसाठी माफक दरात निवास्थान सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे
 • अनुदानित दरात उपहारगृह सुविधा आहे
 • कामगारांच्या पाल्यांकरिता मोफत मराठी आणि इंग्रजी माध्यम बालवाडी सुविधा आहे
 • कामगारांच्या पाल्यांचा उच्च शिक्षणाचा  खर्च महामंडळाकडून मोफत करण्यात येतो
 • कामगारांची दरवर्षी मोफत शारीरिक आरोग्य तपासणी करण्यात येते- शासनामार्फत सनदी अधिकारी यांच्याकरिता असलेल्या सर्व चाचण्या महामंडळातील कामगारांच्या देखील करण्यात येतात
 • कामगार आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांकरिता गंभीर आजाराकरिता झालेला वैद्यकीय उपचाराचा खर्चाचा परतावा महामंडळाकडून देण्यात येतो
 • कामगारांकरिता मोफत योग साधना वर्ग आहे
 • हाफकिन जिमखाना सुविधेमार्फत बॅट मिंटन, टेबल टेनिस, क्रिकेट, कबड्डी व इतर मैदानी खेळाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे
 • महामंडळातील ज्येष्ठ कर्मचारी यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण करण्याचा मान देण्यात येतो.
 • कामगारांना दरवर्षी उत्पादनाशी संलग्न वार्षिक बोनस देण्यात येतो

इतर कंपन्यांमधील कामगारांसाठी सुविधा :

 • हाफकिन महामंडळामार्फत इतर औद्योगिक संस्था आणि कंपन्यांमधील कामगारांना सायबर गुन्हे आणि सायबर सुरक्षेविषयी मोफत जनजागृती करण्यात येते.
 • हाफकिन महामंडळामार्फत सर्पदंश आणि विंचूदंश या विषयी जनमानसांत असलेल्या शंका आणि अंधश्रद्धा याविषयी जनप्रबोधन करण्यात येते तसेच एखाद्या व्यक्तीस सर्पदंश झाल्यास काय प्रथमोपचार करावे याविषयी मोफत माहिती देण्यात येते.
 • हाफकिन महामंडळातील कामगारांसाठी असलेली बालवाडी सुविधा ही इतर संस्थेतील, कंपन्यांतील आर्थिक दृष्ट्या गरीब असलेल्या कामगारांच्या पाल्यांना देखील मोफत देण्यात येते.
 • हाफकिन महामंडळ जिमखाना सुविधा ही इतर कंपन्या आणि संस्थेतील कामगारांना देखील नाममात्र दराने देण्यात येते.

Related posts

DSCK CUP : वैभव, पृथ्विक चमकले

थ्री ऑन थ्री बास्केटबॉल स्पर्धा : आग्नेल्स संघाला दुहेरी मुकुट

गणेशोत्सवासाठी पालिकेकडून कडक नियमावली जाहीर; मिरवणुकीवर बंदी, विसर्जनासाठी ५ ते १० जणांना परवानगी

Voice of Eastern

Leave a Comment