Voice of Eastern

मुंबई : 

राज्यातील आरोग्य भरती गट ‘क’ आणि गट ‘ड’च्या परीक्षांच्या पेपरफुटी प्रकरणानंतर आता भरतीप्रक्रियेला उमेदवारांकडून विरोध होत आहे. #आरोग्यभरतीरद्दकरा या हॅशटॅग अंतर्गत सोशल माध्यमांवर उमेदवारांकडून विरोध करण्यात येत आहे.

आरोग्य विभागाच्या पेपर फुटीमध्ये पुण्यासह मुंबईतील विविध अधिकारी तसेच परीक्षा घेणार्‍या कंपनीच्या प्रमुखांचाच यामध्ये सहभाग असल्याचे उघड झाले आहे. पेपर फुटल्याचे उघड झाल्यानंतरही सरकारकडून आरोग्य विभागाची भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यामुळे परीक्षा दिलेल्या उमेदवारांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यांनी या भरती प्रक्रियेला विरोध करण्यासाठी सोशल माध्यमातून मोहीम राबवली आहे. विद्यार्थ्यांनी #आरोग्यभरतीरद्दकरा या हॅशटॅगखाली आपल्या तीव्र संताप व्यक्त केला आहे. अनेक उमेदवारांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनाच टॅग करून जाब विचारला आहे. परीक्षेचे काम पाहणारी कंपनी व ज्यांच्यावर परीक्षा घेण्याची जबाबादारी असलेल्या विभागातील वरिष्ठ अधिकार्‍यांनीच पेपर फोडले आहेत. मग भरती प्रक्रिया रद्द करून नव्याने घेण्याऐवजी तिच प्रक्रिया पुढे का नेण्यात येत आहे, असा प्रश्न उमेदवारांकडून उपस्थित करण्यात येत आहे. भरती प्रक्रिया रद्द करण्यासाठी कोणाची वाट पाहत आहात, असा संतप्त प्रश्न विद्यार्थ्यांकडून राजेश टोपे यांना विचारण्यात आला आहे. ही भरती रद्द करावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.

Related posts

महापालिकेच्या सेवानिवृत्त शिक्षकांना सात दिवसात लाभ द्या – मंगलप्रभात लोढा

‘गणपती उत्सव प्रेमाचा’ नर्गिस फाखरीने शेयर केल्या खास आठवणी

दीपोत्सवाचं तेज सर्वांच्या आयुष्यात चैतन्य, ऊर्जेचे पर्व घेऊन येवो..! – मुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा

Leave a Comment