Voice of Eastern

मुंबई : 

बाथरूममध्ये महिला अंघोळ करत असताना तिला चोरून बघणाऱ्या व्यक्तीच्या बाबतीत घडला धक्कादायक प्रकार. मुंबईतील दादरच्या भोईवाडा परिसरातील एका इमारतीत राहणारी एक महिला सकाळी घरातील बाथरूममध्ये अंघोळ करीत होती. त्यावेळी खिडकीतून डोकावून कोणीतरी पाहत असल्याचे तिच्या लक्षात आले. त्यानंतर जे घडले ते फारच धक्कादायक होते.

खिडकीतून कोणीतरी पाहत असल्याचे समजताच महिलेने आरडाओरड केला. त्यामुळे खिडकीतून डोकावणाऱ्या व्यक्तीने पळ काढला. ही डोकावणारी व्यक्ती त्याच इमारतीत राहणारा निलंबित पोलीस कॉन्स्टेबल अक्षय चौगुले (३१) असल्याचे उघडकीस आहे. याप्रकरणी महिलेने भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करून गुरुवारी त्याला अटक केली.

अक्षयवर हा चौथा गुन्हा असून भोईवाडा पोलिस ठाण्यात त्याच्यावर विनयभंग आणि चोरीचा तसेच रफी अहमद किडवाई मार्ग पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. याप्रकरणात अटक झाल्यानंतर अक्षयला २०१८ मध्ये पोलिस सेवेतून निलंबितही करण्यात आले होते.

Related posts

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात फुप्फुस पुनर्वसन केंद्र सुरू

मुंबईमध्ये लेप्टो व हेपेटायटीसमुळे १४ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

मुंबईतील २०० केंद्रांवर मिळणार बूस्टर डोस

Leave a Comment