Voice of Eastern
ताज्या बातम्यामोठी बातमीशहर

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांच्या शंकाच्या निरसनासाठी हेल्पलाईन सुविधा

banner

मुंबई : 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दहावी व बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले. या पार्श्वभूमीवर विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना परीक्षेचे स्वरुप व त्यासंदर्भातील उपस्थित होणार्‍या शंकाचे निरसन करण्यासाठी व आवश्यक मार्गदर्शन करण्यासाठी राज्य मंडळातर्फे सर्व विभागीय मंडळात नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. नियंत्रण कक्षातील हेल्पलाईनची सुविधा ४ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आली असून, नियंत्रण कक्षाचे कामकाज सकाळी ९ ते रात्री ७ या वेळेत सुरू राहणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) लेखी परीक्षा ४ ते ३० मार्च तर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी, पालक व संबंधित घटक यांना येणार्‍या सर्व शंकांचे निरसन करण्यासाठी व आवश्यक मार्गदर्शनासाठी राज्यमंडळ व सर्व विभागीय मंडळात नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या नियंत्रण कक्षामध्ये विद्यार्थ्यांच्या शंकाचे निरसन करण्यासाठी समुपदेशक व शिक्षक समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यासाठी मंडळाकडून विशेष हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. नियंत्रण कक्ष व हेल्पलाईनसाठी नियुक्त केलेले अधिकारी व मंडळ कर्मचार्‍यांची दूरध्वनीचा तपशील विद्यार्थ्यांसाठी मंडळाकडून जाहीर करण्यात आला आहे.

विभागनिहाय हेल्पलाईन क्रमांक

पुणे – ०२०२५७०५२७१, ९८८१६५२२३९, नागपूर – ०७१२२५६५४०३, ९८२२६९५३७२, मुंबई – ०२२२७८९३७५६, ८९२८८२२२५, औरंगाबाद – ०२४०२३३४२२८, ९९२२९००८२५, अमरावती – ०७२१२६६२६४७, ८६०५३२७०८९, कोल्हापूर – ०२३१२६९६१०१, ८००७५९७०७१, नाशिक – ०२५३२९५०४१०, ७७५५९०३४२७, लातूर – ०२३८२२५१६३३, ९८३४१६५००७, कोकण – ०२३५२२२८४८०, ८८०६५१२२८८

परीक्षेसंदर्भातील माहिती संकेतस्थळावर जाहीर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंडळामार्फत परीक्षाबाबत केलेले नियोजन, विशेष उपाययोजना, विविध घटकांसाठी निश्चित केलेल्या विशेष मार्गदर्शक सूचना तसेच नियंत्रण कक्ष व हेल्पलाईन सुविधाबाबतचा तपशील विभागीय मंडळाच्या अंतर्गत येणार्‍या माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालये यांना देखील स्वतंत्र परिपत्रकाद्वारे कळविण्यात आला आहे. तसेच तो मंडळाच्या www.mahahsscboard.in संकेतस्थळावर जाहीर करण्यात येत आहे.

विद्यार्थ्यांसाठी प्रश्नपेढी विकसित

दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रश्न प्रकारांचा सराव व माहिती होण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे विषयनिहाय प्रश्नपेढी विकसित करण्यात आली आहे. या प्रश्नपेढ्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध केल्या आहेत. परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयांचा सराव, स्वयंअध्ययनासाठी या प्रश्नपेढ्यांची मदत होईल आणि परीक्षेला जाण्यापूर्वी त्यांचा आत्मविश्वास वाढेल, या हेतूने हे प्रश्नसंच तयार केले जात आहेत, अशी माहिती राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक एम देवेंदर सिंह यांनी दिली.

Related posts

‘साथ सोबत’ चित्रपटाचा उत्कंठावर्धक टिझर प्रदर्शित

Voice of Eastern

खुशखबर; रेल्वे प्रवाशांना आता प्रवासात मिळणार ब्लँकेट, चादरी

Leave a Comment