Voice of Eastern

गेली दोन वर्षे कोरोनाचा प्रादुर्भावामुळे अत्यंत साधेपणाने होळीचा सण साजरा करावा लागला .  यंदा मुंबईसह अख्या राज्यात होळीची उत्सुकता मोठ्या प्रमाणात दिसुन येत आहे. सर्वच ठिकाणी होळीची लाकडं, सुके गवत यांसह इतर वस्तू गोळा करण्यास सुरूवात झाली आहे. होळीचासाठी देशभरात वेगवेगळ्या पद्धतीने आणि उत्साहाने साजरा केला जात असला तरी, तरी होळीचा सण हा कोळी समाजाचा प्रमुख सण मानला जातो. मुंबईतील कोळीवाड्यांमध्ये आजतागायत अगदी जुन्या पारंपरिक पद्धतीनं होळी साजरी करण्यात येते. मुंबईमधील अनेक भागांमध्ये देखील होळी ही सांस्कृतिक व पारंपरिक रित्या साजरी केली जाते. मुंबईतील काही जुन्या आणि प्रसिद्ध होळी बद्दल तुम्हाला माहित आहे का? नसेल माहिती तर नक्की वाचा हि बातमी.

चिराबाजार ताडवाडी उत्सव मंडळ, गिरगांव

गिरगांवातील ताडवाडीत ही होळी ही मोठ्या उत्साहाने आणि पारंपरिक पद्धतीने शतकानुशतके साजरी केली जात असून यंदा या मंडळाचे हे ११६ वे वर्ष आहे. फाल्गुन शुक्ल पंचमी पासून या सणाची सुरूवात होते . पहिल्या दिवशी पारंपरिक पद्धतीने एक छोटीसी भेंडीच्या झाडाची फांदी होळी म्हणून अग्नीत अर्पण करण्यात येते . अश्याप्रकारे नऊ दिवस छोट्या होळ्या करण्यात येतात.

दहावा दिवस हा हुताशमी पौर्णिमेचा असतो त्यादिवशी मोठं झाड निवडून त्याबरोबर प्रसवलेली केळ आणि आंब्याची छोटी डहाळी लावली जाते . वाडीतील सुवासिनी रांगोळी घालून सजावट करतात आणि परंपरे नुसार होळीची पुजा करतात. ही होळी “नवसाची होळी ” म्हणून प्रसिद्ध आहे.दरवर्षी शेकडो भाविक आपला नवस फेडण्यासाठी ह्या होळीला येतात, नवस फेडण्याकरीता होळीला अर्पण केलेल्या साड्या आदिवासी पाड्यात व वृद्धाश्रमात वाटल्या जातात. नारळाचा प्रसाद भाविकांमध्ये वाटला जातो . मुख्य होळीनंतर पाच दिवस म्हणजेच पंचमी पर्यंत होळी पेटत राहते आणि ह्या दरम्यान वेगवेगळे उपक्रम राबवले जातात आणि बच्चेकंपनी साठी वेगवेगळ्या कार्यक्रमांच आयोजन देखील केले जाते ‘अशी माहिती मंडळाचे कार्यकारणी सदस्य अमित भद्रीचा ह्यांनी दिली.

गुरुदत्त स्पोर्ट्स क्लब, सायन

पारंपरिक चाली रुढींची सामाजिक प्रभोधनाशी सांगड घालत गुरुदत्त स्पोर्ट्स क्लब गेल्या १० वर्षांपासून होळी साजरा करत आहे. दरवर्षी थीमनुसार विषय निवडले जातात .मागील वर्षी कोरोना प्रादुर्भावात लसीकरणाचे महत्त्व पटवून देणारा पुतळा बनवून  कोरोनाचा वध करणारा देखावा उभारला उभारून पारंपरिक पद्धतीने होळी दहन करत उत्सव साजरी केला.
यंदा युक्रेन महायुद्ध व कोरोणा महामारी मुळे भारतीय आर्थिक व्यवस्थेवर झालेले परिणाम दर्शवनारा पुतळा बनवण्यात आला आहे असे मंडळाचे सदस्य ओमकार बाळसराफ यांनी सांगितले.

बाळ सेवा मित्र मंडळ – चेंबूर (लालडोंगरची आई जगदंबा )
या विभागात मागील ३६ वर्षे होळी उत्सव पारंपरिक व थाटामाटात साजरा केला जातोय. हा उत्सव मंडळाचे वरीष्ठ सदस्य सुनील जनार्दन म्हात्रे यांच्या कुटूंबाने सुरू केले पण याचे रूपांतर आता एका मंडळात झाले. मागील ६ वर्षे हे उत्सव मंडळ साजरा करत आहे.या उत्सवानिमित्त मंडळाच्या सर्व महिला मंडळ दर्शनाला येतात आणि मनोभावे पूजन करून दहन नंतरचे पुढील पाच दिवस हा उत्सव सुरू ठेवतात अशी माहिती मंडळाचे हितचिंतक कल्पेश मढवी ह्यांनी व्हॉईस ऑफ ईस्टर्न सोबत बोलताना दिली.

Related posts

इनडोअर क्रिकेट विश्वचषक : भारताचा श्रीलंकेवर १२ धावांनी विजय

सावधान : मुंबईतील हवा होतेय प्रदूषित

Voice of Eastern

अभिनेता अपारशक्ती खुराणा चमकला अमेरिकेतील दक्षिण आशियाई फिल्म फेस्टिव्हलमध्ये

Leave a Comment