Voice of Eastern

मुंबई :

गृहपाठ बंद करण्यासंदर्भातील सुतोवाच नुकतेच शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केले. त्यावर सर्वच स्तरातून टीका होत असताना शाळेतच गृहपाठाच्या तासिकेचे नियोजन केल्यास दप्तराचे ओझे कमी होण्याबरोबरच गृहपाठासंदर्भातील सूचना सिस्कॉम संस्थेने जाहीर केलेल्या ‘प्राथमिक शिक्षण-बदलाची दिशा’ या अहवालात केली आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी शिक्षणात सकारात्मक बदल सुचविणारा हा अहवाल शालेय शिक्षण विभागाला सादर करण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी शाळेतच त्यांच्याकडून स्वाध्याय करून घ्यावा, अशी सूचना अहवालामध्ये मांडण्यात आली आहे. सध्या नव्या मूल्यमापन प्रणालीत स्वाध्यायाला महत्त्व आले आहे. त्याला गुणही ठेवण्यात आले आहे. फक्त ते स्वाध्याय सर्जनशील व वेगवेगळे असावेत. आज मुले घरी गृहपाठ करत नाहीत. यावर उपाय म्हणून तर शाळेतच पर्यवेक्षीय स्वाध्याय करून घेतल्यास विद्यार्थ्यांकडून स्वयंअध्ययन पद्धतीने केला जाईल. यासाठी रोज फक्त एका विषयाचा शाळेच्या पहिल्या तासिकेला स्वाध्याय वर्गातच शिक्षकांनी करून घ्यायचा आहे. शिक्षकांनी तयार केलेल्या प्रश्नसंचातील प्रश्न द्यावेत. हे प्रश्न पारंपरिक प्रश्नांपेक्षा वेगळे असावेत व पाठ्यपुस्तकातील धड्याखाली नसावेत. शासनाने बनवलेल्या स्वाध्याय पुस्तिकाही या तासिकेला सोडून घेणे शक्य आहे. त्या आठवड्यात शिकवलेल्या भागावर लगेच त्याच आठवड्यात चाचणी झाल्याने शिक्षकांनाही विद्यार्थ्यांना कितपत समजले हे लक्षात येईल. मुलांचाही त्या घटकाचा अभ्यास पक्का होईल. शिक्षकांसमोरच विद्यार्थी स्वाध्याय सोडवत असल्याने शिक्षक तिथेच शंकांचे निरसन करू शकतील. मुलांच्या अक्षरापासून अनेक बाबतीत सूचना करणे यामुळे शक्य होईल असेही सिस्कॉमनेही म्हटले आहे.

गुणवत्ता सुधारण्यासाठी शिक्षणात सकारात्मक बदल सुचविणारा दिशादर्शक अहवाल शासनाला दिला आहे. यामधील सूचनांचा अभ्यास केल्यास शिक्षणमंत्री यांच्या गृहपाठ नको यावर योग्य मार्ग निघेल. तसेच पर्यवेक्षित स्वाध्याय ही संकल्पना प्रत्यक्षात आणल्यास विद्यार्थ्यांच्या गृहपाठ व दप्तराचे ओझे यावर तोडगा निघेल.
– वैशाली बाफना, अध्यक्ष, सिस्कॉम

Related posts

त्रस्त झाले टेलिव्हिजन अभिनेता अलन कपूर! का ते जाणून घ्या!

बूस्टर डोस घ्यायचा आहे, नऊ महिने थांबा!

Voice of Eastern

नायर रुग्णालयातील परिचारिका १ मेपासून संपावर

Leave a Comment