सुखी संसारात कधी न कधी एखादा वाद होताच. नवरा बायको कधी न भांडतात पण यात हि एक प्रकारचं प्रेम दडलं असतं. मात्र नवरा नवरा-बायकोच्या भांडणात एक अजबच प्रकार घडला. या दोघांच्या भांडणामुळे आजू बाजूच्या चक्क १० घरांना आग लागली. हो हो बरोबर वाचलं तुम्ही. हा अजब प्रकार घडला तो म्हणजे सातारा जिल्हातील पाटण तालुक्यातील माजगावा येथे.
नेमकं घडलं काय ?
आजकाल सोशल मीडियावर अनेक अजब किस्से आणि गोष्टी पाहायला मिळतात. सातारा जिल्हातील पाटण तालुक्यातील माजगाव येथील नवरा बायकोच्या भांडणाची आग स्वतःच्या घरात तर लागली पण त्याच सोबत आजूबाजूच्या १० घरांना देखील या आगीत समाविष्ट झाले. स्वतःच्या घरा सोबत आजूबाजूच्या लागलेल्या आगीमुळे चक्क ५० लाखाहून अधिकचे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. भांडण नेमकं कोणत्या कारणावरून झालं अद्याप हे स्पष्ट झाले नाही. मात्र घरगुती कारणावरून भांडण झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र हे भांडण इतकं शिगेला गेलं कि चक्क यात अनेक घरांना आग लागली. हे भांडण इतकं टोकाला गेले कि यात नवऱ्याने स्वतःच्या घरात आग लावली आणि यात घरातील सिलिंडर ने याचा पेट घेतला. यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले ज्यामुळे आजूबाजूचे सुमारे १० घराणं याचा फटका बसला.