मुंबई
कांदिवली भागामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे एका रिक्षा चा धक्का एका वृद्धाला लागल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.रस्ता ओलांडणाऱ्या एका वृद्ध व्यक्तीसमोर अचानक एक रिक्षा आली होती. रिक्षा चालकाने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण तरीही वृद्धाला रिक्षाच्या मागच्या बाजूचा फटका बसला आणि ते जागीच कोसळले.नअपघातानंतर रिक्षाचालकानेच वृद्धाला उचलून त्याच्या घरी नेले होते, मात्र दोन दिवसांपूर्वी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर रिक्षा चालकावर पोलिसांनी कारवाई केली आहे.
घटनेनंतर रिक्षाचालकाने वृद्धाला उचलून रिक्षात बसवले आणि त्याच्या घरी आणले होते. त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र रुग्णालयात उपचारादरम्यान 15 सप्टेंबर रोजी वृद्धाचा मृत्यू झाला.
वृद्धाच्या या अपघाताची दृश्यं सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. व्हिडीओमध्ये संबंधित वृद्ध व्यक्ती रस्ता ओलांडताना दिसत आहे. अचानक एक रिक्षा त्याच्या समोरुन जाते. रिक्षा चालक वृद्धाला वाचवण्यासाठी रस्त्याच्या एका बाजूला जाण्याचा प्रयत्न करतो, पण वृद्धाला रिक्षाच्या मागच्या बाजूचा फटका बसतो आणि तो जागीच खाली पडतो.
अपघातानंतर रिक्षा चालकाने वृद्धाला कडेवर उचलून बाजूला नेऊन ठेवले होते. यावेळी रिक्षामध्ये काही प्रवासीही होते. दरम्यान, या वृद्धाच्या मृत्यूनंतर कांदिवली पोलिसांनी रिक्षा चालकाला अटक केली असून पुढील कारवाई सुरु केली आहे