Voice of Eastern

अलिबाग :

छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानी म्हणून साऱ्या देशाला रायगडचा अभिमान आहे, मात्र याच रायगड जिल्ह्याल अवैध धंद्यांचा घट्ट विळखा बसत असून, अवैध धंद्यांचा जिल्हा ही नवी ओळख निर्माण होत आहे. जिल्ह्यातील अलिबाग, म्हसळा, पेण, मुरुड, रोहा, माणगाव, श्रीवर्धन व अन्य तालुक्यात मटका, जुगार, गावठी हातभट्टीने सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आले. याबाबत वारंवार पोलिसांकडे तक्रारी होऊन, त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

रायगड जिल्ह्यात गावठी हातभट्टीने तरुण पिढी बरबाद होत आहे. जिल्ह्यातील तरुण मटका, जुगार क्लब यांसह हातभट्टीच्याही अगदी आहारी जाऊन कुटुंब उद्ध्वस्त करत आहेत. जिल्ह्यात बोकाळलेले अवैध मटका, जुगार क्लब, चक्री जुगार, हातभट्टी पूर्णतः बंद करण्याचे धाडस पोलीस प्रशासन का दाखवत नाही असा प्रश्न स्थानिकांकडून विचारण्यात येत आहे.
अवैध धंदात रोहा तालुका एक पाऊल पुढेच आहे. रोहा पोलीस प्रशासन देवकान्हे येथील विषारी हातभट्टी कांड, पाली येथील स्पिरीट कांड, मुरूड तालुक्यातील नांदगाव हायस्कूलमधील कांड असे अनेक कंद जिल्ह्यात घडले आहेत.
केळदवाडी, निवी ठाकूरवाडी, चणेरा वरकस पट्ट्याच्या काही भागात गावठीचे उत्पादन होते, तीच गावठी रोहा व परिसरात विक्री होते. गावठी सहज मिळत असल्याने तरुण पिढी अक्षरश: बरबाद होत आहे. जोडीला विषारी ताडीमाडी आहेच, याकडे पोलीस व उत्पादन शुल्क प्रशासन दुर्लक्ष करीत असतानाच जिल्ह्यात मटका, जुगार क्लब, जुगार चक्री ऑनलाईन धंदे ठिकठिकाणी सुरू आहे. याकडे पोलीस प्रशासन लक्ष देत नसल्याने तरुण पिढी वाया घालविण्याचा विडा जिल्हा पोलीस प्रशासनाने उचलला काय ? असा सवाल सर्वसामान्य नागरिक करीत आहेत. मात्र जुगार क्लब फुल्ल चालू असल्याचे खात्रीशीर वृत्त असल्याने अवैध धंदे रोखण्यात पोलीस प्रशासन सध्यातरी अपयशी ठरल्याची चर्चा चोहोबाजुने सुरु आहे.

जिल्हयात धाडसाने जुगार, मटका, जुगार सुरू असल्याने त्यावर ठोस कारवाईची भूमिका पोलीस प्रशासन घेतो का? हे आता पाहावे लागणार आहे. जिल्ह्यातील प्रमुख शहर सहित ग्रामीण भागात हातभट्टीचीही बिनधास्त विक्री सुरू असल्याने संबंधीत पोलीस प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी पुन्हा जोर धरत आहे. याउलट झाडाझडती घेणाऱ्या पोलिसांनी जुगार, क्लबसह मटका, जुगार चक्री ऑनलाइन, गावठी हातभट्टीबाबत पोलीस प्रशासनाने भूमिका स्पष्ट करावी याच मागणीत विविध भागातील अवैध धंद्यांवर पोलीस प्रशासन कठोर कारवाई करतो का ? हे पुन्हा एकदा स्पष्ट होणार आहे. दरम्यान,₹ जिल्ह्यातील मटका, जुगार क्लब, गावठी हातभट्टी अवैध धंद्यांवर रायगड पोलीसअधीक्षक अशोक दुधे यांच्या मार्गदर्शनाखाली उशिरा का होईना नेमकी काय कारवाई करतात ? याकडे पुन्हा नव्याने सर्वांचे लक्ष लागले आहे

Related posts

खेलो इंडिया : खो खोमध्ये महाराष्ट्र विरुद्ध ओरिसा अंतिम फेरीत लढणार

सँड आर्ट, वॉल पेन्टिंग्जमधून जागतिक पर्यावरण दिनाबाबत जागृती

Voice of Eastern

अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत ३ ते २५ मार्चपर्यंत

Leave a Comment