मुंबई :
भारत हा जगातील पंडुरोगाचे प्रमाण जास्त असलेल्या देशांपैकी एक असून जवळपास ५८ टक्के गर्भवती महिला पंडुरोगाने त्रस्त आहेत. भारताताील २० ते ४० टक्के माता मृत्यूचे मुख्य कारण अनेमिया अर्थात पंडुरोग आहे. दक्षिण आशियातील अॅनेमियामुळे होणार्या माता मृत्यूंमध्ये ८० टक्के भारताचा वाटा असल्याचे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. नुकतेच मुंबई ऑब्सेट्रिक अँड गायनॅकॉलॉजिकल सोसायटी व सायन्स इंटिग्रासह दुसरी वर्ल्ड काँग्रेस ऑफ अॅनिमियाचे झूमद्वारे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जगभरातील तज्ज्ञ डॉक्टरांनी अॅनिमिया समस्या व उपयांबाबत चर्चा केली.
नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेच्या अहवालानुसार दक्षिण आशियातील अॅनेमियामुळे होणार्या माता मृत्यूपैकी ८० टक्के भारताचा वाटा आहे. न्यूट्रिशनल अॅनिमिया ही भारतातील प्रमुख आरोग्य समस्या आहे. व ती प्रामुख्याने लोहाच्या कमतरतेमुळे आहे. नॅशनल फॅमली हेल्थ सर्व्हेनुसार, सर्व वयोगटांमध्ये अॅनिमिया मोठ्या प्रमाणावर पसरलेला आहे व जवजवळ ५८ टक्के गर्भवती महिलांमध्ये, ५० टक्के गर्भवती नसणार्यामध्ये आहे. स्तनपान देणार्या स्त्रिया, किशोरवयीन मुलींमध्ये ५६ टक्के (१५-१९ वर्षे), किशोरवयीन मुलांमध्ये ३० टक्के आणि ३ वर्षाखालील मुलांमध्ये सुमारे ८० टक्के प्रमाण आहे. ही प्रौढांसाठीही एक प्रमुख आरोग्य समस्या आहे, ५५ टक्के महिलांना, ५८ टक्के गर्भवती महिलांना आणि २४ टक्के पुरुषांना प्रभावित करते. कधीही विवाहित महिलांमध्ये पांडुरोगचे प्रमाण नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे-२ नुसार ५२ टक्क्यांवरुन नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे-३ मध्ये ५६ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे-४ नुसार महाराष्ट्रात एकूण ४८.० टक्के स्त्रिया अशक्त आहेत आणि ४९.३ टक्के गर्भवती स्त्रिया अशक्त असल्याचे समोर आले आहे.
वर्ल्ड काँग्रेस अॅनिमिया जागतिक स्तरावर ३५०० डॉक्टर व प्रेक्षकांचा सहभाग होता. ज्यात भारतातील २९२६ सदस्य, आफ्रिकन देशातील १४४, युनायटेड स्टेट्समधील १२९ व इतर अनेक सदस्यांनी सहभाग नोंदवला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून फिगोच्या इलेक्ट अध्यक्ष डॉ.अॅनी किहारा आणि माजी अध्यक्ष डॉ. सी.एन.पुरंदरे तसेच एफआयजीओचे अध्यक्ष डॉ. जीन कॉनरी, एसएएफओजीचे इलेक्ट अध्यक्ष डॉ. श्याम देसाई, एफआयजीओ २०२२-२३ चे प्रतिनिधी डॉ.नंदिता पालशेतकर, डॉ. संजय गुप्ते आदी उपस्थित होते.
वर्ल्ड काँग्रेस अॅनिमिया हा भारत व जगभरातील लोहाच्या कमतरतेचा म्हणजेच पंडुरोग कमी करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठीचा एक उपक्रम आहे. यंदाचा उपक्रम हा अधिकाधिक मोठा व उत्तम होणार असून यामध्ये १४ संस्थांमधील १६ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वक्ते सहभागी झाले आहेत. ज्यामुळे हा उपक्रमाबाबत अधिकाधिक माहिती मिळून उपायोजना करण्यास मदत होईल. वर्ल्ड अॅनिमिया फोरमद्वारे वैद्यकीय तज्ञांसाठी शिफारसी व निरीक्षणांमध्ये जागतिक विज्ञानाचे रुपांतर करण्यासाठी त्यांचे कौशल्य वापरण्यात येते. वर्ल्ड काँग्रेस अॅनिमिया मार्गदर्शक तत्वे, धोरणे व प्रक्रिया तयार करण्याचा अत्याधुनिक मार्ग आहे.