Voice of Eastern
ताज्या बातम्यामोठी बातमीशहर

रघु राय यांच्या हस्ते फोटो पत्रकारांच्या संकेतस्थळचे उद्घाटन

banner

मुंबई : 

बातमी, इतिहास पुन्हा लिहिला जाऊ शकतो, मात्र फोटो हे कायम त्या काळाचे साक्षीदार राहतात. त्यामुळे प्रत्येक महत्त्वाच्या घटनेत फोटो टिपणे, संग्रहित करणे ही छायाचित्रकाराची जबाबदारी आहे, असे सांगत ज्येष्ठ फोटो पत्रकार रघू राय यांनी सोमवारी मुंबई प्रेस क्लबच्या माध्यमातून सुरू केलेल्या Picswire.com या संकेतस्थळाचे उद्घाटन केले. महाराष्ट्रातील ८० हून अधिक फोटो पत्रकारांनी आपले काम लोकांपर्यंत पोहचून त्यातून उत्पन्नाचे साधन मिळावे म्हणून हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे.

फोटो पत्रकारांनी सहकारी तत्त्वावर सुरू केलेल्या या संकेतस्थळाचे रघू राय यांनी कौतुक केले. सहकार्य म्हणून आपले काही फोटो त्यांनी संकेतस्थळावर देण्याचे कबूल केले. कोविड काळामध्ये फोटो संबंधित कामे कमी झाल्याने फोटो पत्रकारांना अर्थाजर्नाचे अन्य पर्यायांबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. क्लबचे अध्यक्ष आणि ‘पिक्सवायर’चे संपादक सिद्धार्थ भाटिया यांनी संकेतस्थळाकडून बर्‍याच अपेक्षा असून फोटो पत्रकारांसाठी ते एक व्यासपीठ असल्याचे सांगितले. क्लबचे सचिव राजेश मॅस्करहस यांनी हे संकेतस्थळ केवळ सुरुवात असून त्यात वैविध्य आणण्यात येणार असल्याचे सांगितले.

कोविडमुळे सर्वांनाच आर्थिक नुकसान सहन करावे लागले. अनेक पत्रकार, फोटो पत्रकारांच्या नोकर्‍या गेल्या. वेतन कापले आणि आर्थिक स्त्रोत आटले, अशा वेळी त्यांना मदत करण्यासाठी मुंबई प्रेस क्लबने सहा महिन्यांपूर्वी हा उपक्रम हाती घेऊन कमीतकमी वेळात त्यासाठी लागणारे सर्व तांत्रिक सहकार्य केले. सोमवारपासून कार्यान्वयित झालेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून मुंबई, खेळ, कोविड, राजकारण, बॉलिवूड या क्षेत्रातील अनेक फोटो रोज उपलब्ध होणार आहेत. तसेच विशेष फोटो, जुन्या फोटोंचे संग्रह सुद्धा इथे पाहायला मिळतील. माध्यमसमूह, वर्तमानपत्रे, बातम्यांशी संबंधित संकेतस्थळ, खाजगी संस्था आणि एखादी व्यक्ती हे फोटो संकेतस्थळावरून पैसे देऊन डाऊनलोड करू शकतील. समर खडस, किर्ती पराडे, प्रविण काजरोळकर यांची ही कल्पना असून, आयटी तज्ज्ञ तीर्थराज सामंत आणि मिहिर बेल्लारे यांनी हे संकेतस्थळ मोफत तयार करून दिले.

Related posts

गुरु नानक महाविद्यालयाकडून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली

Voice of Eastern

SSC RESULT : प्रतीक्षा संपली, इयत्ता दहावीचा निकाल उद्या होणार जाहीर

Voice of Eastern

दोन वर्षांनंतर ८५ लाख विद्यार्थी प्रथमच जाणार शाळेत

Voice of Eastern

Leave a Comment