Voice of Eastern

मुंबई

नोव्हेंबरच्या अखेरीस तीन दिवस अचानक पावसाने हजेरी लावल्याने मुंबईमध्ये साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव पुन्हा दिसून आला आहे. मुंबईमध्ये नोव्हेंबरमध्ये मलेरिया, गॅस्ट्रो आणि डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली होती. डिसेंबरमध्ये मलेरिया आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांमधील ही वाढ कायम राहिल्याचे दिसून येत आहे.

ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव वाढत असताना मुबईमध्ये साथीच्या आजारांचा प्रभाव कायम असल्याचे दिसून येत आहे. मागील काही दिवसांपासून ताप आणि जुलाबसारख्या आजाराने त्रस्त असल्याच्या मुंबईकरांच्या तक्रारी वाढल्या आहेत. मुंबईत डिसेंबरमध्ये १२ दिवसांत मलेरियाचे १२७ तर गॅस्ट्रोचे १४१ रुग्ण आढळले आहेत. मलेरिया व गॅस्ट्रोच्या रुग्णांच्या संख्येतील वाढ ही झपाट्याने वाढताना दिसत आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात गॅस्ट्रोचे ५० रुग्ण आढळले होते. तर दुसर्‍या आठवड्यात यामध्ये तब्बल ९१ रुग्णांची भर पडली असून १२ डिसेंबरपर्यंत १४१ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्याचप्रमाणे मलेरियाच्या रुग्णांमध्येही दुपट्टीने वाढ झाल्याचे दिसून येत आहे. पहिल्या आठवड्यात मुंबईत ५६ मलेरियाच्या रुग्णांची नोंद झाली होती. दुसर्‍या आठवड्यात ही संख्या १२७ वर पोहोचली आहे. डेंग्यूच्याही २१ रुग्णांनी नोंद झाली आहे.

लेप्टो, हेपेटायटीस, एच१एन१ आटोक्यात
मुंबईमध्ये मलेरिया, गॅस्ट्रोच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असली तरी लेप्टो, हेपेटायटीस, एच१एन१ आटोक्यात आले आहेत. मुंबईत डिसेंबरमध्ये लेप्टोचे २, हेपेटायटीस ९ आणि चिकुनगुनियाच्या ५ रुग्णांची नोंद झाली तर एच१एन१चा एकही रुग्ण सापडला नाही.

डिसेंबरमध्ये सापडलेले रुग्ण
मलेरिया : १२७
लेप्टो : २
डेंग्यू : २१
गॅस्ट्रो : १४१
हेपेटायटीस : ९
चिकुनगुनिया : ५
एच१एन१ : ०

Related posts

चर्नी रोड रेल्वे स्थानकात तात्पुरत्या स्वरुपात तिकीट खिडकी सुरु

Voice of Eastern

पीआरएन चुकलेल्या विद्यार्थ्यांना सुधारित गुणपत्रिका मिळणार

Voice of Eastern

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत ‘देखो आपला महाराष्ट्र’ टुर पॅकेज जाहीर

Leave a Comment