Voice of Eastern

मुंबई :

  • भारतातील पहिले आधुनिक सेवासुविधांनी सुसज्ज असे दुमजली ‘वॉटर रिसायकलिंग कम्युनिटी टॉयलेट’ घाटकोपरमध्ये उभारण्यात आले आहे. यामध्ये महिला व पुरुषांसाठी शौचकूपे ¡असण्याबरोबरच वॉशिंग मशिन, स्नान, मुतारी, शुद्ध पिण्याचे पाणी यांची व्यवस्था करण्यात आली आहे. या टॉयलेटचा वापर वर्षभरात २० हजार लोकांना करता येणार आहे.

घाटकोपर पश्चिमेकडील जगदुशानगर नजीक शिवस्फुर्ती मंडळ येथे ‘हिंदुस्थान युनिलिव्हर’ कंपनीच्या सौजन्याने मुंबई महापालिका आणि एचएसबीसी यांच्या सहभागातून स्थानिक नगरसेविका डॉ. अर्चना भालेराव व माजी नगरसेवक संजय भालेराव यांच्या प्रयत्नाने
हे टॉयलेट उभारण्यात आले आहे. या टॉयलेटमध्ये महिला व पुरुषांसाठी ३८ शौचकूपे असणार आहेत. तसेच त्याचा वापर करणार्‍या नागरिकांना कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशिन, स्नान करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. या टॉयलेटचा वापर नागरिकांना माफक दरात करता येणार असून, वर्षभरात साधारणपणे २० हजार नागरिक याचा लाभ घेण्याची शक्यता आहे. टॉयलेटमध्ये वापरण्यात येणार्‍या पाण्याचा पुनर्वापर करून अंदाजे १० दशलक्ष लिटर पाण्याची बचत करण्यात येणार आहे. आधुनिक टॉयलेटचे लोकार्पण राज्याचे पर्यटन, पर्यावरण व पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या उपस्थितीत २४ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता होणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे ईशान्य मुंबई विभागप्रमुख राजेंद्र राऊत आणि माजी नगरसेवक संजय भालेराव यांनी दिली.

Related posts

अमराठी भाषिकांचे मुंबई विद्यापीठ घेणार मराठीचे वर्ग

म्हाडातर्फे ९८४ सदनिका व २२० भूखंडांची सोडत १० जून रोजी

शिष्यवृत्ती परीक्षा २० जुलैला होणार; २३ ते ३० एप्रिलपर्यंत नोंदणीसाठी मुदतवाढ

Leave a Comment