Voice of Eastern
ताज्या बातम्यामोठी बातमीशहर

भारताने ‘मिशन सागर’मधून १५ देशांना दिला मदतीचा हात

banner

नवी दिल्ली : 

कोरोना महामारीच्या काळामध्ये हिंद महासागराच्या किनारपट्टीवरील देशांना मदतीचा हात देण्यासाठी भारत सरकारने ‘मिशन सागर’ उपक्रम हाती घेतला होता. त्यानुसार भारतीय नौदलाने मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या १५ देशांमध्ये जहाजे तैनात करत २१५ पेक्षाही जास्त दिवस ‘मिशन सागर’ उपक्रम राबवून मित्र देशांना अन्नधान्य, औषधे, वैद्यकीय उपकरणे, ऑक्सिजन याचा पुरवठा केला. या मिशनमध्ये भारतीय नौदलाच्या जहाजांनी जवळपास ४०,००० सागरी मैल (एनएम) एकत्रित अंतर पार केले.

कोरोनामुळे सर्वच देश संकटात सापडले होते. यावेळी भारताने मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या १५ देशांना विविध प्रकारे मदतीचा हात पुढे केला. भारताने हिंद महासागराच्या किनारपट्टीवर असलेल्या मालदिव, मॉरिशस, मदागास्कार,कोमोरोस, सेशेलस, जिबूती, इरिट्रिया, सुदान आणि दक्षिण सुदान, व्हिएतनाम, कंबोडिया, इंडोनेशिया, थायलंड, व्हिएतनाम, श्रीलंका, बांगलादेश आणि मोझांबिक या देशांना मदत करण्यासाठी ‘मिशन सागर’ ही मोहीम हाती घेतली. त्यानुसार भारताने ३००० मेट्रिक टन अन्नधान्य, ३०० मेट्रिक टनांपेक्षाही जास्त द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजन, २० आयएसओ कंटेनर्स आणि ९०० ऑक्सिजन काँन्सट्रेटर्स यांची मदत पुरविण्यात आली.

भारतीय नौदलाच्या जहाजांनी इडाई (आडीएआय) चक्रीवादळानंतर मोझांबिकमधील बैरा शहरात अडकलेल्या जवळपास ३,५०० लोकांची सुटका केली. त्याचप्रमाणे संकटात सापडलेल्या लोकांचा बचाव करून त्यांना वैद्यकीय सेवा व मदत पुरविली. आयएनएस मगर या जहाजाने एप्रिल २०१९ मध्ये बैरा आणि मोझांबिकमधील नागरिकांसाठी २५० टन तांदूळ आणि कोरोनाचा सामना करण्यासाठी आवश्यक असणार्‍या सुमारे ५०० टन औषधांचा पुरवठा केला. आयएनएस केसरीने डिसेंबर २०२१ मध्ये मोझांबिकला ५०० टन अन्नधान्याची मदतही केली आहे. त्याचप्रमाणे मे २०२० मध्ये मालदिव, मॉरिशस, मदागास्कार,कोमोरोस, सेशेलस या देशांना वैद्यकीय टीम, औषधे आणि ५८० टन अन्नधान्य पुरवले. ऑक्टोबर २०२० मध्ये जिबूती, इरिट्रिया, सुदान आणि दक्षिण सुदान २७ टन अन्नधान्य अन्नधान्य, डिसेंबर २०२० रोजी व्हिएतनाम, कंबोडिया या देशांना प्रत्येकी १५ टन एचएडीआरची मदत केली. मार्च २०२१ मध्ये मदागास्कार,कोमोरोस देशांना प्रत्येकी १००० टन तांदुळ, ऑगस्ट २०२१ मध्ये इंडोनेशियाला १०० एमटी लिक्विड ऑक्सिजन, ३०० ऑक्सिनज कॉन्सट्रेटर, थायलंडला ३०० ऑक्सिजन सिलिंडर, व्हिएतनामला १०० एमटी लिक्विड ऑक्सिजन, ०५ आयएसओ कंटेनर, ३०० ऑक्सिनज कॉन्सट्रेटर पुरवले. त्याचप्रमाणे ऑगस्ट २०२१ मध्ये श्रीलंकेला १०० एमटी लिक्विड ऑक्सिजन, ०५ आयएसओ कंटेनर, सप्टेंबर २०२१ मध्ये बांगलादेशला २ मोबाईल ऑक्सिजन प्लांट आणि डिसेंबर २०२१ मोझांबिकला ५०० टन अन्नधान्य पुरवण्यात आले.

Related posts

ऑटिझमग्रस्त मुलांना प्रशिक्षण देणारे नायर रुग्णालय देशातील हे पहिले रुग्णालय

Voice of Eastern

खेळामुळे खेळाडूंच्या मानसिकतेचा कस लागतो – एम. देवेंदर सिंग

Voice of Eastern

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2022 : रोईंगमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा

Leave a Comment