Voice of Eastern
आरोग्यताज्या बातम्यामोठी बातमी

पुढील २० वर्षांत भारत होणार जागतिक कर्करोगाची राजधानी – ग्लोबल कॅन्सर ऑब्जर्व्हटरीचा अहवाल

banner

मुंबई :

देशामध्ये कर्कराेगाच्या रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र हे प्रमाण असेच वाढत राहिले तर पुढील २० वर्षांमध्ये भारत जागतिक कर्करोगाची राजधानी होण्याची शक्यता ग्लोबल कॅन्सर ऑब्जर्व्हटरी या जागतिक संस्थेने नुकत्याच प्रकाशित केलेल्या अहवालातून वर्तविण्यात आली आहे. या २० वर्षांमध्ये भारत कर्करोग रुग्णांच्या संख्येबाबतीत अमेरिकेलाही मागे टाकण्याची शक्यता या अहवालामध्ये वर्तविण्यात आली आहे. राज्यामध्ये सध्या स्तन, ओठ आणि तोंड, गर्भाशय ग्रीवा, फुफ्फुस आणि अन्ननलिकांचे कर्करोगाचे रुग्ण सर्वाधिक सापडत आहेत.

बदलती जीवनशैली, अयोग्य आहार, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन, मद्यपान, शारीरिक निष्क्रियता आणि प्रदूषण अशा अनेक महत्त्वाच्या कारणामुळे मागील काही वर्षांपासून कर्करोगाच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. भारतामध्ये २०२२ मध्ये कर्करोगाचे १४ लाख ६१ हजार ४२७ इतक्या रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्येही सर्वाधिक रुग्ण उत्तरप्रदेशमध्ये २ लाख १० हजार ९५८ इतके असून, त्याखालोखाल महाराष्ट्रात ९७ हजार ७५९ तर पश्चिम बंगालमध्ये १ लाख १३ हजार ५८१ इतक्या नवीन रुग्णांची नाेंद झाली आहे. ग्लोबल कॅन्सर ऑब्जर्व्हटरीच्या अहवालानुसार २० वर्षांनंतर भारतातील नवीन कर्करोग रुग्णांची संख्या २४ लाख ५६ हजार ४७८ पेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे. यावरून २०२२ च्या तुलनेत २०४५ पर्यंत कर्करोग रुग्णांच्या संख्येत ७३.८ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. याच कालावधीत अमेरिकेतील नवीन कर्करोग रुग्णांच्या संख्येत ४२ टक्क्यांनी तर संपूर्ण जगामध्ये ६३ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे.

देशामध्ये नवीन कर्करोगाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याबरोबरच मृत्यूच्या प्रमाणातही वाढ होणार आहे. २०२२ मध्ये भारतामध्ये कर्करोगाने ९ लाख १६ हजार ८२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. २०४५ मध्ये ही संख्या १६ लाख ५७ हजार ५१९ इतकी होण्याची शक्यता आहे. यावरून पुढील २० वर्षांमध्ये भारतातील कर्करोगाचा मृत्यूदर हा ८०.८ टक्क्यापर्यंत वाढणार आहे. याच कालावधीत अमेरिकेतील मृत्यूदर ५४ टक्के तर जगातील मृत्यूदर ७३ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. यावरून पुढील २० वर्षांत नवीन रुग्ण आणि कर्करोगाने होणाऱ्या मृत्यूच्या बाबतीत भारत अमेरिकेला आणि संपूर्ण जगाला मागे टाकून जगाची कर्करोगाची राजधानी बनणार असल्याचे ग्लोबल कॅन्सर ऑब्जर्व्हटरीच्या अहवालामध्ये म्हटले आहे.

वयाच्या ७५ व्या वर्षी १०० पैकी १० जणांना धोका

सध्या वयाच्या ७५ वर्षापूर्वी कर्करोग होण्याचा धोका १०.६ टक्के इतका आहे. तर कर्करोगाने मृत्यू होण्याचा धोका ७.२ टक्के इतका आहे. म्हणजेच १०० पैकी १० जणांना कर्करोग होण्याचा आणि १०० पैकी ७ जणांचा कर्करोगाने मृत्यू होत आहे.

वाढते प्रदूषण, तणाव, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन, मद्यपान, धूम्रपानामुळे कर्करोग वाढत आहे. जंक फूड आणि खाण्याच्या बदललेल्या सवयींमुळे नागरिकांमध्ये स्थूलपणा वाढत आहे. स्थूलपणा कर्करोग होण्याचे महत्त्वाचे कारण आहे.

– डॉ. गिरीश राजाध्यक्ष, कर्करोग विभाग प्रमुख, नायर रुग्णालय

भारतात ३५ टक्के कर्करोग तंबाखूने, ४० टक्के दूषित अन्न व जंक फूडने तर पाच टक्के कर्करोग हा अनुवांशिक कारणाने होतो. अनुवांशिकतेमुळे होणार कर्करोग टाळता येतो. मात्र लोक याकडे लक्ष देतात. तंबाखूजन्य पदार्थ, रासायनिक घटकांच्या वापरामुळे होणाऱ्या कर्करोगाकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे.

– डॉ. दिलीप निकम, कर्करोग तज्ज्ञ व रेडिओथेरपी विभागप्रमुख, बॉम्बे रुग्णालय

Related posts

ठाकरेंचे सरकार ‘ना हलले ना फुलले’- नारायण राणे

महाराष्ट्रातील ज्यू वारसा स्थळे पर्यटनासाठी खुली करणार – पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा

Voice of Eastern

वीज आणि गॅस दरवाढीविरोधात महाविकास आघाडीचे आमदार तिसऱ्या दिवशी आक्रमक

Voice of Eastern

Leave a Comment