सध्या देशात एका बाजूला आयसीसी वर्ल्डकप हरण्याची निराशा आहे तर दुसऱ्या बाजूला अंतर राष्ट्रीय स्पर्धेत भारताने रौप्य पदक पटकावले आहे. हो हो तुम्ही बरोबर वाचलं. नुकतेच ओमान येथे झालेल्या आशियाई सेलिंग चेंपियंशिप मध्ये भारताच्या महिला जोडीने रौप्य पदक पटकावले आहे. महाराष्ट्राची श्वेता शेरवेगार आणि मध्य प्रदेशची हर्षिता तोमार या जोडीने ४९ ईआर एफएक्स या श्रेणीत रौप्य पदक पटकावले आहे .
Congratulations to the Sailing duo of #HarshitaTomar and #SwetaShervegar on winning a Silver medal in the Asian 49er Sailing Championships. pic.twitter.com/lG7CLXHTHO
— Dept of Sports MYAS (@IndiaSports) November 11, 2021
तब्बल १० देशातून विविध श्रेणीत सेलिंग स्पर्धेसाठी स्पर्धक ओमान इथे आपले कौशल्य सादर करीत आहेत. यात भारत देखील आहेत. ४९ ईआर एफएक्स या श्रेणीत हाँगकाँग ने प्रथम स्थान पटकावले तर भारत द्वितीय स्थानावर आहे. गेल्या अनेक दिवसांपासून श्वेता आणि हर्षिता या स्पर्धेची तयारी करत आहेत.
या अगोदर श्वेता ने वर्ल्ड कॉमन वेल्थ-गेम्स सह अनेक अनेक राष्ट्रीय स्पर्धेत आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करत आपल्या देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा लावला आहे. तसेच आपल्या राज्याचा शिव छत्रपती क्रीडा पुरस्कार देऊन देखील श्वेताला सन्मानित करण्यात आले आहे. डॉक्टरचे शिक्षण घेतले असल्याने श्वेता हिने कोविद काळात अनेक गरजू रुग्णांची सेवा देखील केली आहे. तर हर्षिता तोमर ही २००८ मध्ये झालेल्या कॉमन वेल्थ गेम्स मध्ये ओपन लेझर या श्रेणीत भारतासाठी कांस्य पदक पटकावले.
गेल्या अनेक दिवसांपासून या स्पर्धेसाठी आम्ही दोघे मिळून तयारी करत होतो. आता जरी हे रौप्य पदक कमावले असले तरी आम्ही १६ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या वर्ल्ड चेंपियंशिपसाठी अजून मेहनत घेत आहोत. तिथे देखील अजून चांगली कामगिरी बजावत आपल्या देशासाठी सुवर्ण पदक आणण्यासाठी नक्कीच आम्ही प्रयत्न करू.
– श्वेता शेरवेगार