सैन्य दिनानिमित्त बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयने (Vivek Oberoi) त्याच्या आगामी ‘वर्सेस ऑफ वॉर’ (Verses Of War) या सिनेमाचा टीझर शेअर केला आहे. टीझर शेअर करत त्याने लिहिले आहे की, भारतीय सैन्याला त्यांच्या असाधारण शौर्य, धैर्य आणि दृढ संकल्पासाठी सलाम करत आहे.
‘वर्सेस ऑफ वॉर’मध्ये विवेक ओबेरॉयने भारतीय सैनिकाची तर रोहित रॉयने पाकिस्तानी सैन्य अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. विवेक आणि रोहित हे दोघे १५ वर्षांनंतर पुन्हा एका सिनेमात एकत्र दिसणार आहेत. २००७ मध्ये ‘शूटआउट अॅट लोखंडवाला’ या संजय गुप्ता यांच्या सिनेमात दोघे एकत्र दिसले होते. ‘वर्सेस ऑफ वॉर’ चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद कदम यांनी केले. विकास गुटगुटिया, FNP मीडिया, गिरीश जोहर निर्मित आणि प्रस्तुत, विवेक आनंद ओबेरॉय आणि ओबेरॉय मेगा एंटरटेनमेंट सहनिर्मित केली आहे.
आपल्या शांततापूर्ण श्वासासाठी प्राणांची आहुती देणार्या असंख्य भारतीय सैन्य दलातील वीरांना आपण कधीही विसरू नये, असे विवेक ओबेराय म्हणाला. तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी मुलांसोबत पतंग उडवतानाचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर विवेक ओबेरॉयने शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने मकर संक्रांतीत मला पतंग उडवायला फार आवडते. आपली ही परंपरा आता मी माझ्या मुलांपर्यंत पोहोचवत असल्याचे त्याने व्हिडीओसोबत म्हटले आहे.