मुंबई
येत्या काही दिवसातच दिवाळीला सुरुवात होणार आहे. दिवाळी म्हणजे फटाके आणि मिठाईची रेलचेल. मात्र आता आताच्या तरुणांना आता यात चॉकलेटचा सुद्धा समावेश केला आहे. याच अनुषंगाने आयटीसीच्या (ITC LTD) फबेल एक्सक्विझिट चॉकलेट्स भारतातली पहिली लक्झरी चॉकलेटची घोषणा केली आहे. महत्वाचं म्हणजे या मध्ये सोन्याचा वापर पहिल्यांदाच करण्यात आला आहे.
कोणी केलं हे?
आयटीसीच्या (ITC LTD) फबेल एक्सक्विझिट चॉकलेट्स जे भारतात लक्झरी चॉकलेट्स बनवण्यात अग्रेसर आहेत त्यांनी आज हार्ट ऑफ गोल्ड कलेक्शन अनावरणाची घोषणा केली. या कलेक्शनमध्ये खाद्योपयोगी सोन्याचा वापर पहिल्यांदाच करण्यात आला आहे. दिवाळी निमित्ताने फबेलने आपले चॉकलेट तज्ज्ञ व मिशेलीन स्टार मिळविलेले शेफ मार्को स्ताबीलेबरोबर संयुक्तरित्या काम करून हे कलेक्शन बनवले आहे. शेफ मार्को स्ताबीले एक जगविख्यात इटलीतील शेफ असून सोनं खाण्यात वापरणं हा त्यांचा हातखंडा आहे. दोघांच्या संयुक्त कार्यामुळे असे अद्वितीय हार्ट ऑफ गोल्ड चॉकलेट कलेक्शन बनवणे शक्य झाले.
फबेल हार्ट ऑफ गोल्ड कलेक्शन हा, देश घडविण्यासाठी आणि समाजाला व्यापक पातळीवर मदत करण्यात अर्थपूर्ण योगदान देणाऱ्या निवडक प्रतिष्ठित व्यक्ती आणि संस्था यांच्या असामान्य कर्तृत्वाचा सन्मान करण्याचा आणि ते साजरे करण्याचा आमचा प्रयत्न आहे. नारायणा हेल्थचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक डॉ. देवी शेट्टी, आकार चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापक अमला रुईया आणि २०२० उन्हाळी पॅरालिम्पिक्समधील सुवर्णपदक विजेते कृष्णा नागर यांचा सर्वोत्तम कामगिरीसाठी व योगदानासाठी फबेल हार्ट ऑफ गोल्ड टायटलने सत्कार करण्यात आला. त्यांनी समाजावर पाडलेल्या सकारात्मक प्रभावाचा सन्मान करण्यासाठी लिमिटेड एडिशन महोगनी वूडन केसमध्ये खास तयार केलेले हार्ट ऑफ गोल्ड कलेक्शन रेंज भेट देऊन सत्कार करण्यात आला.
याची किंमत किती?
देशभरातील फबेल बुटिक्समध्ये फबेल हार्ट ऑफ गोल्ड कलेक्शनचे मर्यादित बॉक्सेस १० प्रालिनच्या बॉक्ससाठी कर समाविष्ट करून रु.२१०० या किमतीत उपलब्ध आहेत. हे कलेक्शन प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर बुक केले जाऊ शकते. उत्सवी महोगनी वूडन केसेससह असलेली रेंज, जी मान्यवरांना भेट म्हणून देण्यात आली होती, ती, कर समाविष्ट करून रु.२१००० या खास किमतीला उपलब्ध आहे, या विक्रीतून जमा होणारा निधी मेक-अ-विश फाउंडेशनला देण्यात येईल. त्यामुळे ग्राहकांना या खास हार्ट ऑफ गोल्ड कलेक्शनचा अनुभव घेण्याचा आग्रह करण्यात आला.