मुंबईतील नौदल गोदीत 21 नोव्हेंबर 2021 रोजी आयोजित समारंभात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत ‘आयएनएस विशाखापट्टणम’ या पी15बी स्टेल्थ गायडेड मिसाईल विनाशिकेचा नौदलाच्या ताफ्यात समावेश करण्यात आला. विशाखापट्टणम श्रेणीच्या चारपैकी भारतीय नौदलाच्या स्वतःच्या जहाज रचना संचालनालयाने संपूर्णपणे भारतात रचना केलेल्या आणि माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड, मुंबईकडून बांधणी केलेल्या पहिल्या विनाशिकेचा नौदलाच्या ताफ्यात समावेश झाला आहे.