मुंबई :
कर्मवीर भाऊराव पाटील प्रबोधिनी वाचनालय कुर्ला व सहयोगी संस्थाच्यावतीने महिला आयोग कार्यपध्दतीची तोंडओळख जनहितार्थ मार्गदर्शन व कर्तुत्ववान महिलांच्या सन्मानाचे आयोजन करण्यात आले होते. परिवहन मित्र सामाजिक प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष विनोद साडविलकर यांनी संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमास माहिती अधिकार कार्यकर्ता अनिल गलगली यांनी आयोगाची घटना व कर्तव्य, आयोगाची प्रमुख उद्दिष्टये, आयोगाचे अधिकार, आयोगाचे उपक्रम इत्यादीची प्राथमिक माहिती दिली.
कुर्ला रेल्वे पोलीसच्या पूजा गवळी, ज्योत्सना दळवी, मनपा घन कचरा व्यवस्थापन विभागातील स्वच्छतादूत नीरू सोलंकी, मंजुळा बाबरीया, दयाबाई, कुर्ला कोर्ट बार असोसिएशनच्या अॅड. सुरेखा गायकवाड, दीपाली जगताप, उज्वला रिंगे, केईएमच्या परिचारीका श्रुती गमरे, आरपीएफच्या मंदाकिनी साबळे, के. निर्मला, महिला बचत गटच्या प्रज्वला इंगळे, भाटीया शाळा शिक्षिका अंजना व्हटकर, सुनेत्रा नारायणी ट्रस्टच्या नयना साळवी, कविता मोसमी, कुर्ला पोस्ट ऑफीसच्या श्वेता कामत, कल्पना शिंदे, कुर्ला रेल्वे स्टेशन मास्तर सायली तोरस्कर, सुरेखा वाघमारे, नवप्रवाहच्या अरूणा सावंत, रेश्मा खरात, दिव्यांग लावणी नृत्यांगना सोनम पाटील सामाजिक कार्यकर्ते इत्यादी कर्तुत्ववान महिलांचा सन्मान अनिल गलगली यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य टू व्हीलर यूजर्स असोसिएशन मुंबई दिव्यांग विभाग प्रमुख गिरीश कटके, सलीम शेख, रूग्ण मित्र रमेश चव्हाण, राजेंद्र गायकवाड, रामकुमार वर्मा, धनंजय पवार, रोहन पालकर, अमिता शर्मा, विश्वनाथ सावंत, आबा वाघमारे, चारूदत्त पावसकर, हणमंत शिर्के इत्यादी मान्यवर उपस्थित होते. महिला आयोग कार्यालयाच्यावतीने दिनदर्शिका २०२२ चे वाटप केले. विविध आस्थापनेत कार्यरत महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले. आयोजक विनोद साडविलकर यांनी शाल, पुष्पगुच्छ व अल्पोहार देऊन नारी शक्तीचा सन्मान केला.