Voice of Eastern

मुंबई :

सरकारी रुग्णालयांमध्ये अवयवदानामध्ये जे.जे. रुग्णालयाची महत्त्वपूर्ण भूमिका असताना १८ मे रोजी जे.जे. रुग्णालयात झालेल्या मेंदूमृत महिलेच्या आतड्यांचे दान करण्यात आले. जे.जे. रुग्णालयामध्ये आतापर्यंत झालेल्या अवयवदानाच्या प्रक्रियेमध्ये प्रथमच छोट्या आतड्यांचे यशस्वीरित्या अवयव दान करण्यात आले.

१५ मे रोजी अ‍ॅड. रिना बनसोडे (४३) या जे. जे. रुग्णालयामध्ये न्युरोसर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. वर्णन वेलहो यांच्या पथकांतर्गत दाखल झाल्या. उपचारादरम्यान डॉक्टरांच्या टीमने त्यांनी १८ मे रोजी रात्री १०.३८ वाजता मेंदूमृत असल्याचे घोषीत केले. त्यानंतर समाजसेवा अधिक्षक सुनील पाटील आणि अनिल सोनावणे यांनी रुग्णांच्या नातेवाईकांना अवयवदानाबद्दल संपूर्ण माहिती दिली. त्यानंतर त्यांनी अवयवदानाबाबत सकारात्मकता दर्शवल्यानंतर रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. संजय सुरासे आणि वैद्यकीय अधिकारी यांच्या टीमने रुग्णांच्या अवयवदानाची प्रक्रिया तातडीने सुरू केली. बनसोडे यांचे मृत्रपिंड, कॉर्निया, हृदय, तसेच छोटे आतडे यांचे दान करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार दान करण्यात आलेले अवयव हे जे.जे. रुग्णालयासह मुंबईतील ग्लोबल रुग्णालय, कोकिलाबेन रुग्णालय, नानावटी रुग्णालयातील गरजूंमध्ये प्रत्यारोपित करण्यात आले.

मुंबईतील हे पहिलेच यशस्वीरित्या झालेले छोट्या आतड्याचे अवयव दान आहे. ज्या रुग्णालयात अवयवदान झालेले छोटे आतडे दिले त्या रुग्णालयामधील गरजू रुग्णाला छोट्या आतड्याची निकडीची आवश्यकता होती. छोटे आतडे मिळाल्यानंतर लगेचच शस्त्रक्रिया झाल्याने रुग्णाला जीवदान मिळाले आहे. झेड.टी.टी.सीच्या नियम आणि मार्गदर्शक सूचनेनुसार कोरोनानंतर मुंबईमधील सार्वजनिक रुग्णालयामध्ये झालेले हे पहिलेच अवयवदान ठरले आहे. अवयवदान केल्यानंतर जे.जे. रुग्णालयाच्या पथेप्रमाणे पार्थिवाला रुग्णालयातील सर जमशेदजी जीजीभॉय यांच्या पुतळ्यासमोर रात्री २ वाजता डॉक्टर्स आणि कर्मचार्‍यांनी मानवंदना दिली.

न्यूरोसर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. वर्णन वेलहो, शल्यचिकित्साशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अजय भंडारवार, बधिरीकरण विभागाचे प्रमुख डॉ. उषा बडोले, सुक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अमिता जोशी, औषधवैद्यकशास्त्र विभागाच्या डॉ. प्रिया पाटील, अधिसेविका योजना बेलदा यांच्या प्रयत्नाने अवयवदानाची प्रक्रिया सुरळीत पार पडली. वैद्यकीय अधिकारी यांची टीम डॉ. अरुण राठोड, डॉ. वैशाली भालचिम, डॉ. दिलीप गवारी, डॉ. सुमित प्रजापती, डॉ. सौरभ पायरे, डॉ. नितीन कोळंबकर, डॉ. चित्रा सेल्वराज आणि डॉ. पुनम जैस्वाल यांनी रुग्णांचे नातेवाईक आणि सर्व विभागामध्ये समन्वय साधून अवयवदानाच्या प्रक्रियेत मोलाचे सहकार्य केले.

Related posts

‘फायटर’ च्या गाण्याचं इटलीमध्ये होणार खास शूट

बोटात अडकलेली अंगठी काढण्यास दुर्लक्ष केल्यास बोटही कापावा लागेल

Voice of Eastern

मुंबईतील सरकारी रुग्णालयांमध्ये जे.जे. रुग्णालय आणि कामा रुग्णालय स्वच्छतेमध्ये अव्वल

Voice of Eastern

Leave a Comment