मुंबई
म्हाडाच्या विविध विभागातील ५६६ पद रिक्त आहे. ही पदे भरण्याकरता ऑनलाइन पद्धतीने काही दिवसापूर्वी अर्ज मागवण्यात आले होते. या भरतीला जोरदार प्रतिसाद तरुणाने दिला होता आता या परीक्षेचे वेळापत्रक म्हाडा प्रशासनाने जाहीर केले आहे. त्यानुसार भरतीची परीक्षा ५ डिसेंबरपासून सुरु होणार आहे.
१४ वेगवेगळ्या संवर्गातील पदांसाठी पावणेतीन लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत. यापैकी अनेक उमेदवारांनी एकापेक्षा अधिक पदांसाठी अर्ज भरले आहेत. त्यामुळे म्हाडाने विविध पदांसाठीची परीक्षा एकाच दिवशी आयोजित न करता विविध क्लस्टरमध्ये परीक्षांचे नियोजन केले आहे. या परीक्षेचे वेळापत्रक म्हाडाने जाहीर केले आहे.
येत्या ५ डिसेंबरला क्लस्टर ७ मधीलब लघुटंकलेखक, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, भूमापक, अनुरेखक रोजी सकाळच्या सत्रात आयोजित करण्यात आली आहे.
तर १२ डिसेंबर रोजी क्लस्टर १ मधील कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (स्थापत्य), सहायक अभियंता (स्थापत्य) आणि क्लस्टर ३ मधील सहायक विधी सल्लागार या पदांची परीक्षा सकाळच्या सत्रात आयोजित केली आहे. तसेच १२ डिसेंबर रोजी क्लस्टर ४ मधील कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदासाठीची परीक्षा दुपारच्या सत्रात आयोजित केली आहे.
परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना मालाच्या संकेतस्थळावरून हॉल तिकीट मिळवता येणार आहेत याची सूचना त्यांना त्यांच्या मोबाईल वरती देण्यात येणार आहे.
तर उर्वरित परीक्षांचे वेळापत्रक काही दिवसातच जाहीर होणार असल्याचेही म्हाडाकडून सांगण्यात आले आहे. एकाहून अधिक पदांच्या परीक्षांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना परीक्षेची संधी देण्यासाठी म्हाडाकडून विविध क्लस्टरमध्ये परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. म्हाडाने ४ क्लस्टरमधील उमेदवारांची परीक्षा घेण्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. इतर क्लस्टरमधील उमेदवारांच्या परीक्षेचे वेळापत्रक लवकरच जाहीर येईल, असे म्हाडा प्रशासनाने सांगितले आहे.