Voice of Eastern
आरोग्यताज्या बातम्या

स्टेरॉईडचा मारा करणार्‍या जिम तरुणांसाठी घातक

banner
  • मुंबई 

डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय अनेक जिममध्ये तरुणांना मोठ्या प्रमाणात स्टेरॉईड व प्रोटीन पावडर दिली जाते. स्टेरॉईडच्या अतिरिक्त वापरामुळे तरुण अनेक आजारांना बळी पडत असून, त्यांचा अकाली मृत्यू होत आहे. अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्याबाबतीतही त्याने काही औषधांचे सेवन केल्याने त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचे स्पष्ट झाले. याचपार्श्वभूमीवर शहरातील जिमवर कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे.

चित्रपटातील कलाकारांची पीळदार शरीरयष्टी पाहून तरुणांमध्ये पीळदार शरीरयष्टीचे आकर्षण वाढत आहे. त्यामुळे अनेक नामवंत जिममध्ये प्रवेश घेण्याकडे तरुणांचा ओढा असतो. भरमसाठी शुल्क भरण्याचीही त्यांची तयारी असते. हजारोंचे शुल्क घेऊन या जिमचालकांकडूनही तरुणांना पीळदार शरीरयष्टी बनवण्याचे आश्वासन दिले जाते. त्यासाठी ते मोठ्या प्रमाणात प्रोटीन पावडर आणि स्टेरॉईडचा वापर करतात. हा वापर करताना ते कोणत्याही डॉक्टरचा सल्ला घेत नाहीत. त्याचा परिणाम तरुणांच्या आरोग्यावर होतो. तरुणांना हृदयविकाराचा झटका येणे, मेंदू पक्षघात, शरीरातील नसांसंदर्भात विविध आजार त्यांच्यामध्ये उद्भवतात. यामुळे अनेक तरुण गंभीर आजाराला सामोरे जातात, तर काहींना जीव गमवावा लागतो.

औषध व अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या सर्व प्रोटीन पावडर आणि स्टेरॉईडचा समावेश हा औषधांमध्ये होतो. त्यामुळे प्रोटीन पावडर आणि स्टेरॉईडची खरेदी व विक्री करण्यासाठी एफडीएच्या लायसन्सची आवश्यकता आहे. परंतु एकाही जिमचालकाकडे अशाप्रकारे लायसन्स नाही. त्यामुळे राज्यातील बहुतांश जिम मालकांकडून ड्रग अ‍ॅण्ड सेफ्टी फूड कायद्याचे उल्लंघन होत आहे. कायद्याचे उल्लंघन करून हे जिम चालक तरुणांच्या जीवाशी खेळत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ऑल फूड अ‍ॅण्ड ड्रग लायसन्स होल्डरचे अध्यक्ष अभय पांडे यांनी केली आहे.

पश्चिम उपनगरातून कारवाईला सुरुवात करा

चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम करणारे कलाकार हे पश्चिम उपनगरातील अंधेरी, विलेपार्ले, जुहू, वांद्रे, गोरेगाव आणि मालाडसारख्या परिसरात राहतात. या कलाकारांमध्ये पीळदार शरीरयष्टीचे प्रचंड फॅड आहे. त्यापार्श्वभूमीवर या परिसरातील जिमवर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही ऑल फूड अ‍ॅण्ड ड्रग लायसन्स होल्डरचे अध्यक्ष अभय पांडे यांनी केली आहे.

Related posts

राज्यात १७ लाख तर, मुंबईत १ लाख ७० हजार नव्या मतदारांची भर

Voice of Eastern

राज्य सेवा परीक्षेसाठी अर्ज करण्यास ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

आरटीई प्रवेशाची मुदत संपली; ६२ हजार १५५ बालकांचे प्रवेश

Leave a Comment