Voice of Eastern

विरार

सध्या जगभरात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. दिवाळी म्हणजे फटाके, कंदील फराळ. मात्र देशात सुरू आलेल्या महागाईने सामान्य नागरिकांचा दिवाळा काढला आहे.महागाईच्या भस्मासुराने संपूर्ण देशात हाहाकार मजला आहे. एका बाजूला बाजारात विविध रंग बिरंगी कंदील तर दुसऱ्या बाजूला तितकेच महाग सुद्धा. यावरच विद्यार्थी भरती संघटनेने बनवलेल्या एका कांदीलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

दर वर्षी सामाजिक विषयांच्या अनुषंगाने विरार विभागातील विद्यार्थी भारती व मराठी भारतीचे कार्यकर्ते तरुण कलाकार सचिन सुतार, राकेश सुतार आणि सुनीता सुतार ही भावंडं दिवाळीत कंदील बनवतात. यावर्षीही एक अनोखी आणि विचार करायला भाग पाडणारी युक्ती या कलाकारांना सुचली आहे.

सामान्य जनतेला न पडवणारी किंमत

नुकतेच सरकारने एक घोषणा केली आहे पुन्हा एकदा घरगुती गॅस ची किंमत वाढणार असून जे या पूर्वी ९०० पर्यंत उपलब्ध होतं त्याचे दर ११०० किंवा १२०० पर्यत वाढणार आणि वाढले देखील. गरिबांच्या घरात पुन्हा चूल पेटवायची वेळ आलीये. सर्वसामान्य घरातील लोकांना पगारच कमी असतो त्यातच कोरोनामुळे मोठ्या प्रमाणत सामान्य नागरिकांना आर्थिक नुकसान झाले आहे. १२००  रुपयांचा बाटला भरला तर त्याचे कुटुंब त्याने कसे जगवावे? सामान्य जनतेला न पडवणारी ही किंमत जीव घेणी आहे असे मत सचिन सुतार यांनी मांडले.

जनतेचा आवाज दाबण्याचा डाव

जनतेचा दबलेला आवाज आणखीन दाबण्याचा हा निव्वळ डाव आहे सर्वसामान्य जनतेला अश्या प्रकारे छळण्याचा या सरकारला कोणताच अधिकार नाही . दिवाळीत दिवे पेटवनं लांब राहिलं साधं गॅस पेटवनं कठीण करणाऱ्या या सरकारला विनंती आहे की लवकरात लवकर ही किंमत कमी करावी. किमान गोरगरिब जनतेला सुखाने खाता व जगता यावं अशी विनंती मराठी भारतीचे राकेश सुतार यांनी केली आहे.

बोलका सिलेंडर

गुदमरलेला व कोंडलेला आवाज आणि सर्वसामान्य जनतेचाचे राग, चिड व्यक्त करणारे हाव भाव गरिबीची व्यथा सांगणारा बोलका सिलेंडर..या प्रकारे कंदीलाची रचना केली आहे अशी माहिती सुनीता सुतार यांनी दिली.

Related posts

आरोग्य विभागातील भरतीसाठी अर्ज सादर करण्यास २२ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

पालघर जिल्ह्यात 5 आयटीआयमध्ये स्कील सेंटर सुरु – कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई महापालिकेच्या ११ शाळांना सीबीएसईची मान्यता

Leave a Comment