मुंबई :
बॉलीवूडची डायनॅमिक जोडी कतरिना कैफ आणि सलमान खान पुन्हा एकदा सोबत बघायला मिळणार असून
टायगर 3 च्या टीझर ने सोशल मीडिया वर चर्चांना उधाण आलं आहे. टायगर च्या फ्रँचायझीमधील हा थरारक भाग गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असताना आज टीझर रिलीज झाला आहे. हा अॅक्शन-पॅक्ड सिनेमा बघण्यासाठी आता सगळेच उत्सुक आहेत.
View this post on Instagram
मनीष शर्मा दिग्दर्शित टायगर 3 त्याच्या अँक्शन चित्रपटाची मेजवानी सगळयांना अनुभवयाला मिळणार आहे. हा अफलातून थ्रिलर आता मोठ्या पडद्यावर बघायला मिळणार असून काय वेगळं असणार हे बघण उत्सुकतेच ठरणार आहे.दिवाळी रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. टायगर 3 चा टीझर बॉलीवूडमध्ये लक्ष वेधून घेत असून हा ब्लॉकबस्टर भारतीय चित्रपटसृष्टीवर कायमस्वरूपी प्रभाव टाकेल आणि वर्षाच्या अखेरीस विजय सेतुपतीसह प्रदर्शित होणार्या कॅटरिनाच्या मेरी ख्रिसमसचीही चाहत्यांना अपेक्षा आहे.