कल्याण :
लसीकरणाचे दोन डोस घेतल्यानंतरही अनेकांना कोरोनाची बाधा होत असल्याने केंद्र शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बूस्टर डोस बंधनकारक केला आहे. मात्र आता या बूस्टर डोसचीही मात्रा चालेनाशी झाली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांना बूस्टर डोस घेतल्यानंतरही कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांना कोरोनाची बाधा झाल्याने त्यांच्यावर गृहविलगीकरणामध्ये उपचार सुरू आहेत. आयुक्त बाधित झाल्याने महापालिका मुख्यालयात नेहमीप्रमाणे नागरिकांना प्रवेश न देता सुरक्षा रक्षकांकडून मुख्य गेटवरच विचारपूस करण्यात येत होती. पालिका आयुक्त सूर्यवंशी यांनीही आपलं कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून गृह मुलगी करणा मध्ये उपचार सुरू आहेत तसेच माझी प्रकृती चांगली असल्याचे त्यांनी सांगितले तसेच नागरिकांनी आपली काळजी घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले आहे.