Voice of Eastern

मुंबई :

महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये कर्मचार्‍यांच्या ड्युटी लावण्याची जबाबदारी ही ग्रंथपाल विभागाकडे असते. मात्र केईएम रुग्णालयातील ग्रंथालय विभागातील प्रमुख ग्रंथपाल व कनिष्ठ ग्रंथपाल हे काही वर्षांपासून ठरावीक कर्मचार्‍यांना झुकते माप देऊन त्यांना रोटेशन पद्धतीने काम न देता एकाच पाळीत काम देत आहेत. तर अन्य कर्मचार्‍यांना मनमानी पद्धतीने ड्युट्या लावत आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या कर्मचार्‍यांकडून १ ऑक्टोबरपासून ‘ नियमानुसार काम आंदोलन’ सुरू करण्यात येणार आहे.

रुग्णालयातील सर्व कर्मचार्‍यांना रोटेशन पद्धतीने ड्युट्या लावण्याची जबाबदारी ग्रंथालय विभागावर असते. त्यानुसार ग्रंथपाल व कनिष्ठ ग्रंथपाल कर्मचार्‍यांना ड्युटी लावत असतात. कर्मचार्‍यांनी प्रत्येक पाळीत सात तास काम आणि शनिवारी अर्धा दिवस काम करणे आवश्यक असते. कामगार आयुक्त यांनी तसे आदेश दिले असून तत्कालीन अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) आणि संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) यांनी तशी मंजुरी दिलेली आहे. मात्र केईएम रुग्णालयातील प्रमुख ग्रंथपालांकडून गेल्या काही वर्षांपासून हा नियम धाब्यावर बसवून काही ठरावीक व्यक्तींना एकच ड्युटी लावली जाते. अन्य कर्मचार्‍यांना रोटेशन पद्धतीने ड्युटी लावून त्यांच्यावर अन्याय करत आहेत. या कर्मचार्‍यांच्या नावे जाहीर करत म्युनिसिपल मजदूर युनियनने वैद्यकीय शिक्षण आणि प्रमुख रुग्णालयांच्या संचालिका डॉ. नीलम अंद्राडे आणि केईएमच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांच्याकडे तक्रार केली होती. मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. अधिष्ठातांचे आदेशही ग्रंथपाल जुमानत नसल्याने ग्रंथालय विभागातील कर्मचारी १ ऑक्टोबरपासून ‘नियमानुसार काम आंदोलन’ करणार आहेत. आंदोलनामुळे होणार्‍या गैरसोयीस किंवा परिणामास प्रशासन आणि दबावाखाली काम करणार्‍या प्रमुख ग्रंथपाल जबाबदार राहतील असा इशारा म्युनिसिपल मजदूर युनियनचे मुंबई सहाय्यक सरचिटणीस प्रदीप नारकर यांनी दिला. तसेच ४ ऑक्टोबरला केईएम अधिष्ठाता डॉ संगीता रावत आणि सर्व संबंधितांना गुलाबपुष्प देऊन गांधीगिरी आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Related posts

मुंबई महापालिकेकडून मराठी शाळांवर अन्याय; शिक्षकांची २० टक्के पदे कायम रिक्त ठेवणार

Voice of Eastern

विद्यार्थीच ठरवणार आयटीआयचे नवे कौशल्य अभ्यासक्रम

Voice of Eastern

मुंबई विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा ; नॅक कडून पाच ऐवजी सात वर्षांसाठी मुदतवाढ

Leave a Comment