Voice of Eastern

मुंबई :

एकीकडे कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असताना मुंबईतील केईएम रुग्णालयाच्या कोविड लॅबमध्ये चाचणी करणार्‍या रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. कोविड चाचणी करणार्‍या लॅबमधील काही कर्मचार्‍यांनी ३१ डिसेंबरची पार्टी एकत्र मिळून केली होती. या पार्टीमध्ये उपस्थित असलेले काही कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती सूत्रानी दिली.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना नियमांचे पालन करून साध्या पद्धतीने नवीन वर्षाचे स्वागत करण्याचे आवाहन नागरिकांना केले होते. मात्र केईएम रुग्णालयाच्या मायक्रोबायोलॉजी लॅबमधील कर्मचार्‍यांनी त्याला केराची टोपली दाखवत ३१ डिसेंबरच्या रात्री एकत्र येऊन पार्टी केली. पार्टीत सहभागी झालेले सर्व कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह झाले असून, त्यांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. त्यामुळे लॅबमधील अन्य कर्मचार्‍यांची सुद्धा चाचणी करण्यात येत आहे. या संदर्भात केईएम रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. प्रवीण बांगर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपल्याला यासंदर्भात माहिती नसल्याचे सांगितले.

राज्यासह देशभरात सध्या कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने देशभरात चिंतेचं वातावरण पसरलं आहे. काल दिवसभरात मुंबईत तब्बल १० हजार पेक्षा अधिक कोरोना बाधित रुग्ण आढळले. जर नागरिकांनी कोरोना निर्यम पाळले नाही तर येत्या काही दिवसात अधिक कठोर निर्बंध लावण्याचा इशारा राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे.

Related posts

जे. जे. रुग्णालयामध्ये औषधांचा तुटवडा; रुग्णांचा संताप

Voice of Eastern

दहावीच्या परीक्षेचे हॉलतिकिट १८ फेब्रुवारीपासून मिळणार

मोबाईलवर फिरणाऱ्या बोटांनी साकारला जंजिरा किल्ला

Leave a Comment