Voice of Eastern

मुंबई

भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा महविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. दिवाळी नंतर फटाके फोडणार असे ट्विट करत त्यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या नेत्यांना टेन्शन दिलं आहे. दिवाळी नंतर महाविकस आघाडी सरकारचे एकूण ६ घोटोळे उघडकीस करण्याचा दावा केला आहे. मात्र आता हे नेते कोण आणि आता कोणते हे नवीन घोटाळे असतील या कडे सर्वांकचे लक्ष लागून राहिले आहे.

नेमकं काय म्हणाले सोमय्या 

येत्या काही दिवसात दिवाळी या सणाला सुरुवात होणार आहे. दिवाळीत लोक फटाके फोडतात. मात्र किरीट सोमय्या दिवाळी नंतर फटाके फोडणार. मात्र ते फटाके जरा वेगळे असणार आहे. ठाकरे सरकार चे आणखी ३ मंत्रीचे ३ घोटाळे आणि जावयाचे ३ घोटाळे एकंदर ६ घोटाळेचा पर्दाफाश करणार, खुलासा करणार असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. या संदर्भात ट्विट देखील केला आहे. मात्र आता हे ३ मंत्री कोण आहे आणि ३ जावई कोण हे अद्याप स्पष्ट केले नाही. म्हणूनच बहुतेक महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये चर्चा रंगली आहे.

या अगोदर किरीट सोमय्या यांनी महाविकास अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहे. या मध्ये उप मुख्यमंत्री अजित पवार, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, परिवहन मंत्री अनिल परब, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ, खासदार भावना गवळी, आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांची नावं आहेत. या संदर्भात तपास यंत्रणांकडून कागद देखील सुपूर्द केले आहेत. मात्र आता रविवारी केलेल्या ट्विट नंतर आता किरीट सोमय्या नेमकं काय करणार या संदर्भात अनेक चर्चा रंगल्या आहेत.

Related posts

मूर्तिकारांच्या मंडपावर आकारलेले छाननी शुल्क रद्द करा

Voice of Eastern

मुंबई अग्निशमन दलास शीघ्र प्रतिसाद वाहनांचे बळ; आपत्कालीन परिस्थितीत अरुंद ठिकाणी पोहोचणार

ठाणे जिल्ह्यातील या मंदिराची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झालीय नोंद

Leave a Comment