मुंबई
ग्राम विकास मंत्री मुश्रीफ यांच्यावर देखील आर्थिक गैरव्यवहार याचे गंभीर आरोप माजी किरीट सोमय्या यांनी केले होते. याबाबत काही बैठकांसाठी सोमय्या कोल्हापुरात उद्या जाणार होते. मात्र त्यांना कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी येथे येऊ नका अशी नोटीस दिली आहे. यानंतर मुंबई पोलिसांनी सोमय्या यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा लावलेला आहे व त्यांना स्थान बंद करण्यात आले होते. मात्र नंतर झालेला हाय वोल्टेज ड्रामा नंतर आता अखेर किरीट सोमय्या महालक्ष्मी ट्रेनमधून कोल्हापूर येथे रवाना झाले आहेत. आता पुढे सोमय्या यांना अटक होते का हे काही तासातच कळेल कारण त्यांना जिल्हाधिकारी यांनी नोटीस दिली आहे त्यामुळे त्यांच्यावर ती कारवाई होऊ शकते असे बोलले जात आहे.
पोलिस मला सांगत आहेत की माझ्या जीवाला धोका आहे. त्यामुळे तुम्ही कोल्हापूरला जाऊ नका. तर मी विचारले की माझ्या जीवाला कोणापासून धोका आहे? तर पोलिसांनी मला सांगितले की मला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांपासून धोका आहे, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे
किरीट सोमय्या यांनी कोल्हापूर जिल्ह्यात येऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी ही नोटीस दिली आहे. नोटीसमध्ये सर्व पोलीस बंदोबस्त गणेश विसर्जनात व्यस्त राहणार असल्याने सोमय्या यांच्या दौऱ्यासाठी बंदोबस्त पुरवायला दर्शवली असमर्थता दर्शवली आहे.