Voice of Eastern

मुंबई :

समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना परवडणाऱ्या शस्त्रक्रिया माफक दरात उपलब्ध करण्यासाठी मसिना हॉस्पिटल आणि रोटरी क्लब ऑफ बॉम्बे नॉर्थतर्फे पुढाकार घेण्यात आला आहे. त्याअंतर्गत मसिना हॉस्पिटलमध्ये ही शस्त्रक्रिया केवळ 1 लाखांमध्ये करण्यात येत आहे. ज्यामध्ये उच्च-गुणवत्तेचे इम्प्लांट आणि अल्ट्रा-आधुनिक लॅमिनार एअर फ्लो ऑपरेशन थिएटरमध्ये दिलेली सर्वोत्तम काळजी आणि पोस्ट सर्जरीसह घरगुती फिजिओथेरपी उपचारांचा समावेश आहे.

मसीना हॉस्पिटलच्या ऑर्थोपेडिक शल्यचिकित्सकांच्या तज्ज्ञ पॅनेलद्वारे १०० हून अधिक गुडघा बदलण्याच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. त्याचे परिणाम अत्यंत समाधानकारक आहेत. संधिवात आणि वेदनांमुळे अपंग झालेल्या अनेक लोकांना, तरुण आणि वृद्ध हे शस्त्रक्रियेनंतर पूर्वीसारखेच चालण्यास आणि काम करण्यास सक्षम झाले आहेत. प्रगत तंत्रज्ञान, भूल देण्याची आधुनिक शस्त्रक्रिया आणि पुनर्वसनाच्या आधुनिक तंत्रांमुळे उत्कृष्ट वैद्यकीय परिणामांसह कमीतकमी वेदना आणि हॉस्पिटलमधून लवकर डिसचार्ज मिळणे शक्य झाले आहे.

रुग्ण त्यांच्या समस्या मोठ्या प्रमाणात आमच्याकडे घेऊन येतात. आम्ही गुडघ्याच्या आर्थ्रोप्लास्टी शस्त्रक्रियेमध्ये प्रभुत्व मिळवले आहे. ज्यामुळे शस्त्रक्रियेतील अस्वस्थता त्वरित कमी होते. गंभीरपणे खराब झालेल्या गुडघ्याच्या सांध्याचे कार्य पुनर्संचयित होते. तुमच्या मांडीचे हाड, शिनबोन, गुडघ्यापासून खराब झालेले हाडे आणि कूर्चा कापून ते धातूचे मिश्रण, उच्च दर्जाचे रेझिन आणि पॉलिमर असलेले कृत्रिम सांधे (प्रोस्थेसिस) बदलणे हे मसिना रुग्णालयातील डॉक्टरांच्या टीमचे कौशल्य असल्याचे मसिना हॉस्पिटलच्या सीईओ डॉ. विस्पी जोखी यांनी सांगितले.

या प्रशंसनीय उपक्रमासाठी जागतिक अनुदान मिळाल्याबद्दल मसिना हॉस्पिटल रोटरी क्लब ऑफ बॉम्बे नॉर्थ आणि त्याच्या प्राथमिक देणगीदारांचे आभारी आहे. लाभार्थ्यांनीही याबाबत माहिती दिली आणि आमच्या सल्लागार डॉक्टरांनी स्वेच्छेने या धर्मादाय शस्त्रक्रिया केल्याचे त्यांनी सांगितले.

Related posts

मुंबई महापालिका निवडणूक आरक्षण : या नगरसेवकांना बसला फटका

Voice of Eastern

‘आश्रय’मधील ‘सतरंगी…’ होळीगीत वाढवणार संगीतप्रेमींचा उत्साह

सनी लिओनी दिसणार आगामी डान्स नंबरमध्ये

Voice of Eastern

Leave a Comment