Voice of Eastern
ताज्या बातम्यामोठी बातमीशहर

‌राज्यामध्ये कोकण उद्योगामध्ये‌ अव्वल; ५३ पैकी २० राज्य निर्यात पुरस्कार पटकावले

banner

ठाणे :

कोकणातील एकूण २० उद्योगांना ‘महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कार’ जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये ठाणे आणि रत्नागिरी जिल्हे अव्वल असून, त्याखालोखाल रायगडला पुरस्कार मिळाले आहेत. त्यामुळे राज्यात कोकण विभाग प्रथम क्रमांकावर असून, कोकण विभागात ठाणे व रत्नागिरी जिल्हे प्रथम क्रमांकावर आहेत. या पुरस्कार सोहळ्यात ५३ पैकी २० पुरस्कार पटकावून संपूर्ण राज्यात कोकण विभागाने प्रथम क्रमांक मिळविला आहे.

राज्य सरकारकडून देण्यात येणारा ‘महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कार’ जाहीर करण्यात आला. यामध्ये कोकण विभागातील २० कंपन्यांनी हा पुरस्कार पटकावला आहे. यामध्ये ठाणे व रत्नागिरी जिल्ह्यांनी बाजी मारली आहे. या दोन्ही जिल्ह्यातील प्रत्येकी ६ कंपन्यांनी हा पुरस्कार पटकावला आहे. तर त्याखालोखाल रायगड जिल्ह्यातील चार कंपन्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. पालघरमधील ३ तर सिंधुदूर्ग एका कंपनीला महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. पुणे-वाकड येथील हॉटेल खमी टिपटॉप येथे आयोजित “महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्काराचे वितरण उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच देशातील २४ तज्ज्ञ संस्थांसोबत सामंजस्य करार” या कार्यक्रमात करण्यात आले.

यावेळी उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन शर्मा, उद्योगविकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, अपर उद्योग आयुक्त प्रकाश वायचळ, अपर उद्योग संचालक संजय कोरबु, उद्योग सहसंचालक शैलेश रजपूत, कोकण विभागाच्या उद्योग सहसंचालक विजू शिरसाठ आदी मान्यवर उपस्थित होते. ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व कोकण विभाग उद्योग सहसंचालक विजू शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या या यशासाठी जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक सीमा पवार यांच्यासह उद्योग विभागातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

कोकणतील उद्योग समूहांनी पटकाविले पुरस्कार

ठाणे : मे. अपर इंडस्ट्रिज लि., मे. कनेक्टवेल इंडस्ट्रिज प्रा.लि., मे.ज्योती स्टील इंडस्ट्रिज, मे. कविश फॅशन प्रा.लि., मे. सचिन्स इम्पेक्स, मे. दलाल प्लास्टिक प्रा.लि.

रत्नागिरी : मे. जिलानी मरीन प्रोडक्ट, मे. कृष्णा ॲन्टी ऑक्सिडन्टस प्रा.लि., मे. अल्काय केमिकल्स प्रा.लि., मे. गद्रे मरीन एक्स्‍पोर्ट प्रा.लि., मे. एम.के.ए. इंजिनियर्स ॲण्ड एक्स्पोर्टर्स प्रा.लि., मे. सुप्रिया लाईफ सायन्स लि.

रायगड : मे.नाईक ओशियन एक्सपोर्टस प्रा.लि., मे. कपूर ग्लास इंडिया प्रा.लि., मे. गंधार ऑईल रिफायनरी (इंडिया) लि., मे. एचकेएस इम्पेक्स, प्रा.लि.

पालघर : मे. खोसला प्रोफिल प्रा.लि., मे. बिक केमिकल्स ॲण्ड पॅकेजिंग प्रा.लि., मे. ईस्टमन केमिकल

सिंधुदूर्ग : मे. अमृता कॅश्यू इंडस्ट्रिज

Related posts

मंत्रा कुऱ्हेची सागरी भरारी

Voice of Eastern

जलयुक्त शिवार, घरकुल व मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना ‘मिशन मोड’ वर राबवाव्यात – उपमुख्यमंत्री

प्रबोधन आंतरशालेय क्रीडा महोत्सवास प्रारंभ

Leave a Comment