मुंबई
पुण्यात दर महिन्याला होणारे बाईक जळीत कांड मुंबईत देखील होऊ लागले आहे का अशी शंका उपस्थित झाली आहे. कारण आज पहाटे 4 वाजेच्या सुमारास मुंबईच्या कुर्ला पूर्व भागातील रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या एका इमारतीत उभ्या असलेल्या सुमारे 25 ते 30 दुचाकींना आग लागली, आग इतकी भीषण होती की त्याच्या ज्वाला इमारतीच्या 8 व्या मजल्यावर पोहचली होती.या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही. आगीची माहिती अग्निशमन दलाला मिळल्यावत 8 अग्निशमन दलाच्या गाड्यांच्या मदतीने आग आटोक्यात आणली. इमारतीच्या लोकांना शंका आहे की ती आग लावण्यात आली आहे, किंवा कोणी धूम्रपान करून जळती काडी फेकली असावी आहे.आता याचा तपास स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाला करत आहे.
कुर्ला नेहरुनगर या भागामध्ये पार्कींग मध्ये उभ्या असणाऱ्या दुचाकीला आज अचानक आग लागली यात इतकी भयंकर होती अग्निशमन दलाचे 16 फायर इंजिन 18 वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा सुरु केला आहे. ही आग नेमकी कशी लागली, कशामुळे लागली याचं कारण अज्ञापही अस्पष्ट आहे.
जेव्हा आग लागली तेव्हा आमच्या भागातील लोक झोपली होती त्यामुळे ही आग कशी लागली कारण अजून कळालं नाही आहे. मात्र आग लागल्याच्या पंधरा मिनिटातच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि काही वेळातच त्यांनी आगीवरती नियंत्रण मिळवले असे स्थानिक नागरिक समीर शेख यांनी सांगितले.