Voice of Eastern

मुंबई

लोकल ट्रेन ही मुंबईची लाइफ्लाईन समजली जाते. दररोज लाखो नागरिक लोकल ट्रेनचा प्रवास करत असतात. यातच मुंबईतील सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकावर महिला कॉन्स्टेबलच्या तत्परतेने एका वृध्द महिलेचा जीव वाचवण्यात आला आहे. सपना गोलकर असे या कॉन्स्टेबलचे नाव असून हे संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे.

नेमकं घडलं काय 

नेहमीप्रमाणे लोकल पकडण्याची धडपड सुरू असताना दुपारी ३च्या सुमारास रोज प्रमाणे प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर बदलापूरला जाणारी धिमी लोकल आली. लोकल पकडायला सर्व प्रवश्यानी लोकल कडे धाव घेतला. यातच एका वृध्द महिलेने देखील लोकल पकडली. मात्र लोकल पकडत असताना या महिलेचा टोल गेल्याने त्या खाली पडल्या. हळूच धीम्या गतीने लोकल सुरू झाली. हे पाहून कार्यतत्पर असणाऱ्या आरपीएफ जवान सपना गोलकर यांनी लगेच जाऊन या महिलेचा जीव वाचवला आणि हा प्रसंग टळला. हा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्ही मध्ये कैद झाला.

कौतुकाचा वर्षाव 

आपले कर्तव्य बजावत असताना या घटनेमुळे जी कामगिरी सपना गोलकर यांनी दाखवली यामुळेच त्यांच्यावर अनेक स्थरांवरून कौतुकाचा वर्षाव करण्यात आला आहे. नुकतेच या संदर्भात स्टेशन मॅनेजर विनायक शेवाळे सह स्टेशन प्रशासन सह सर्वच जवानांकडून सपना हीचा सत्कार करण्यात आला.

Related posts

एकनाथ शिंदे यांच्याकडून धर्मवीर आध्यात्मिक सेनेची स्थापना

अमेरिकेतून पार्सलमधून आले आठ कोटी

आरटीई प्रवेशाची तिसरा टप्पा सुरू; ६२ हजार विद्यार्थ्यांनी घेतले प्रवेश

Voice of Eastern

Leave a Comment