- पवई
गोरेगावच्या आरे कॉलनीत पुन्हा एकदा बिबट्याची दहशत पसरली आहे. बिबट्या मुक्तपणे संचार करताना सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाला आहे. यामुळे परिसरामध्ये दहशत पसरली आहे मानवी वस्तीत अशाप्रकारे बिबट्या फिरत असल्यामुळे येथील नागरिक भयभीत झाले आहे. दिवस असो वा रात्र या भागात बिबट्यांचा वावर वाढू लागले आहेत. अशीच एक घटना 14 सप्टेंबर रोजी सकाळी घडली जेव्हा बिबट्याने मांजराचा पाठलाग केल्याचा व्हिडिओ बुधवारी आरे मिल्क कॉलनीमध्ये व्हायरल झाला.
बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानापासून आरे कॉलनीपर्यंतच्या परिसरात काही वर्षांपासून बिबट्यांचा मुक्त संचार आहे. या हिंस्र प्राण्याचे मानवी वस्तीवर होणारे हल्ले, ही गंभीर समस्या ठरली आहे. आरे कॉलनीत तर काही वर्षांपूर्वी बिबट्यानं अक्षरशः थैमान घातलं होतं. तिथल्या अनेक रहिवाशांना बिबट्याच्या हल्ल्यात प्राण गमवावे लागलेत. सुदैवानं, गेले काही महिने आरे कॉलनीतील ही दहशत काहीशी कमी झाली होती. मात्र आता पुन्हा बिबट्या मानवी वस्तीत दिसून येत असल्यामुळे येथील लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे