Voice of Eastern

ठाणे

ग्रामीण भागात करोना रुग्णसंख्येत घट होत असली तरी गाफील न राहता नियमित लसीकरण, सर्वेक्षण, चाचण्यांवर भर देण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी आरोग्य विभागाला दिले आहेत. करोना रुग्णसंख्येत दिवसागणिक होणारी घट दिलासादायक बाब असली तरी कोविड १९ च्या नियंत्रणासाठी करत असलेल्या उपाययोजनेत खंड पडू न देण्याच्या सूचना त्यांनी आरोग्य विभागाला केल्या. आज त्यांनी दूरदृश्यप्रणाली द्वारे सर्व विभागांची विषयनिहाय बैठक घेऊन महत्वाकांक्षी असणाऱ्या विविध योजना, उपक्रम, अभियानाचा सखोल आढावा घेतला.

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागात करोना साथरोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी ग्रामपंचायतस्तरावर प्रतिबंधक उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गावं करोनामुक्त झाली आहेत. सध्याच्याघडीला ग्रामीण भागात अवघे १५८ करोना बाधित आहेत.

८ लाख ९४ हजार ६९२ नागरिकांचे लसीकरण

आरोग्य विभागाच्या माध्यमातून पाचही तालुक्यात नियमित लसीकरण सत्र सुरु असून आजपर्यंत ८ लाख ९४ हजार ६९२ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले असून यामध्ये ६ लाख ८१ हजार ६३२ नागरिकांनी पहिली मात्रा घेतली आहे; तर २ लाख १३ हजार ६० नागरिकांनी लसीकरणानी दुसरी मात्रा घेतली असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रेंघे यांनी सांगितले .

आजादी का अमृत महोत्सव

यावेळी विविध विषयांवर आढावा घेताना डॉ. दांगडे यांनी आजादी का अमृत महोत्सव हा उपक्रम मोठया आनंदाने जिल्हातील प्रत्येक गावात राबविण्याचे निर्देश दिले. तसेच स्वच्छ भारत सर्वेक्षणात नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी सर्व यंत्रणांनी प्रयत्न करावेत असेही श्री. दांगडे म्हणाले. या बैठकीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते, प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, मुख्य लेखा व वित्तधिकारी सुभाष भोर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीष रेंघे, शिक्षणाधिकारी शेषराव बडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. लक्ष्मण पवार, स्वच्छता व पाणी पुरवठ्याचे प्रकल्प संचालक दादाभाऊ गुंजाळ, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राधेश्याम आडे, महिला व बाल विकास अधिकारी संजय बागुल , लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता उदय कुलकर्णी, कृषि विकास अधिकारी दगडू घुले आदि अधिकारी तसेच गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी दूरदृष्यप्रणाली द्वारे उपस्थित होते.

Related posts

निवासी डॉक्टरांच्या संपासाठी रुग्णालये सज्ज

Voice of Eastern

सोनू सूदचा क्लासी प्रो जिम लूक

विक्रोळीमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

Voice of Eastern

Leave a Comment