Voice of Eastern
ताज्या बातम्यामोठी बातमीशिक्षण

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागासाठी पूर्णवेळ संचालक नियुक्तीसाठी खासदार श्रीकांत शिंदे यांना पत्र

banner

मुंबई :

मागील वर्षभरापासून मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाला पूर्णवेळ संचालक नाही. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या निकालाला विलंब होण्यावर होत आहे. परिणामी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, नोकरी व परदेशातील शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागामध्ये तातडीने पूर्णवेळ संचालक नेमण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेचे माजी सिनेट सदस्य ॲड. वैभव थोरात यांच्याकडून करण्यात आली आहे.

मुंबई विद्यापीठाअंतर्गत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे जिल्हे येतात. या परिसरामध्ये असलेली जवळपास ८०० महाविद्यालये ही मुंबई विद्यापीठाशी संलग्न आहेत. या महाविद्यालयांमध्ये ८ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मुंबई विद्यापीठामार्फत दरवर्षी साधारणपणे ६०० परीक्षा घेण्यात येतात. या परीक्षांचे वेळापत्रक, परीक्षांचे नियोजन, परीक्षांचे निकाल वेळेवर लावणे, त्याचबरोबर पुर्नमुल्यांकलन निकाल वेळेवर लावणे अशी महत्वाची कामे परीक्षा विभागाअंतर्गत करण्यात येतात, परंतु मागील १ वर्षापासून परीक्षा विभागाला पूर्णवेळ संचालक नसल्यामुळे निकाल वेळेवर लागले नाहीत, त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे, तसेच नोकरी व परदेशात शिक्षणाच्या संधीपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागासाठी पूर्णवेळ संचालक त्वरित नियुक्त करण्यात यावी, अशी विनंती करणारे पत्र शिवसेनेचे मुंबई विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य ॲड. वैभव थाेरात यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांना दिले आहे.

Related posts

लांब उडी स्पर्धेत सुवर्ण कामगिरीसह अदा पठाणची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

नवी दिल्लीत झालेल्या इन्स्पायर ॲवॉर्डमध्ये महाराष्ट्राची सुवर्ण कामगिरी

नांदेडच्या वाजिद पाशाचा रोमहर्षक विजय!

Leave a Comment