Voice of Eastern

मुंबई :

मुंबई उपनगरातील ‘१६६- अंधेरी पूर्व’ या विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी ३ नोव्हेंबर २०२२ रोजी मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. ही निवडणूक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पडावी, यासाठी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी निधी चौधरी यांनी १ नोव्हेंबर २००२ रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून ते मतदानाच्या दिवशी म्हणजेच ३ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत निर्देशित क्षेत्रांमध्ये मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. त्याचबरोबर मतमोजणीच्या दिवशी म्हणजेच ६ नोव्हेंबर २०२२ रोजी देखील या क्षेत्रात मद्य विक्री पूर्णतः बंद ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

मद्य विक्री बंदीचे आदेश हे अंधेरी पूर्व मतदार संघाच्या लगतच्या परिसरात देखील लागू असणार आहेत. या अंतर्गत मतदारसंघाच्या पूर्वेस मिठी नदी पासून ‘१६८ – चांदिवली’ मतदारसंघापासून दक्षिणेस ‘१६७ – विलेपार्ले’ मतदारसंघापर्यंत; तसेच पश्चिम दिशेला पश्चिम रेल्वे ट्रॅक ‘१६८ अंधेरी पश्चिम मतदारसंघापासून उत्तरेस जत्वार नगर मार्ग क्रमांक ५, जुहू विलेपार्ले जोड रस्ता ‘१५८ जोगेश्वरी’ या परिसरातील सर्व मद्य अनुज्ञप्ती धारक दुकाने बंद असतील. हा बंद कालावधी मतदानाच्या ४८ तासापूर्वी म्हणजेच १ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून दिनांक ३ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत किंवा मतदान संपेपर्यंत असेल. त्याच प्रमाणे, मतमोजणीच्या दिवशी म्हणजे ६ नोव्हेंबर २०२२ रोजी पूर्ण दिवस मद्यविक्री बंद असेल.

१ नोव्हेंबरला सायंकाळी ६ वाजल्यापासून २ नोव्हेंबर, ३ नोव्हेंबर आणि ६ नोव्हेंबर २०२२ या दिवशी मुंबई उपनगरातील नमूद परिक्षेत्रात मद्यविक्री करीत असल्याचे आढळून आल्यास संबंधितांची अनुज्ञप्ती कायमस्वरूपी रद्द करून संबंधितांवर फौजदारी कारवाई देखील केली जाईल, असेही जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी चौधरी यांनी कळविले आहे.

Related posts

राज्यामध्ये रक्त वाया जाण्याचे पाच वर्षांमध्ये प्रमाण घटले

Voice of Eastern

राज्यात लवकरच उंच इमारतींसाठी ‘महाराष्ट्र लिफ्ट कायदा’

Voice of Eastern

‘जेता’चे पोस्टर अनावरण ‘जेत्या’च्या पदस्पर्शाने

Voice of Eastern

Leave a Comment