Voice of Eastern

पुणे शहर हे विद्येचे माहेरघर म्हणून गेली अनेक दशके ओळखले जाते त्याचप्रमाणे गेल्या काही वर्षात पुण्याची ओळख भारतातील गिर्यारोहणाचे केंद्रस्थान (Mountaineering Hub) अशी देखील झाली आहे. गेल्या काही वर्षात महाराष्ट्रामध्ये गिर्यारोहण आणि साहसी खेळांमध्ये भाग घेणार्‍यांची संख्या लक्षणीय रीतीने वाढली आहे. गिर्यारोहण क्षेत्रामध्ये अभ्यासपूर्ण योगदान देण्यासाठी व या क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पुढाकार घेतला. ऑक्टोबर २०२१ मध्ये गिर्यारोहणतील पदविका अभ्यासक्रमाचा पहिला वर्ग यशस्वीरीत्या सुरू झाला. पदविका अभ्यासक्रमाला मिळालेल्या प्रतिसादानंतर आता त्याच धर्तीवर गिर्यारोहण विषयातील तीन महिन्यांच्या ‘प्रमाणपत्र’ अभ्यासक्रमाची विद्यापीठात सुरूवात होत आहे. हा अभ्यासक्रम येत्या नवीन वर्षात म्हणजेच २०२२ च्या जानेवारीत सुरू होणार असून त्यासाठीची प्रवेश प्रक्रिया १ डिसेंबर २०२१ सुरू झाली आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पार पडणार्‍र्‍या या कोर्सचे सर्व संचालन आणि प्रशिक्षण गिरिप्रेमी या गिर्यारोहण संस्थेद्वारे स्थापन केल्या गेलेल्या गार्डीयन गिरिप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माऊंटेनियरिंग संस्थेच्या अनुभवी आणि पात्र गिर्यारोहकांकडून केले जाणार आहे. या तीन महिन्यांच्या ‘प्रमाणपत्र’ अभ्यासक्रमात हिमालयातील आरोहणाचे प्रशिक्षण नसले तरीदेखील सह्याद्री पर्वतरंगांमधील खडतर प्रशिक्षणाचा समावेश असणार आहे.

कशी कराल प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी

या कोर्सच्या प्रवेशासाठी प्रथम येणार्‍यास प्राधान्य या धर्तीवर प्रवेश देण्यात येणार असून त्यासाठी एका ऑनलाइन फॉर्मद्वारे नाव नोंदविणे अनिवार्य आहे. हा ऑनलाइन फॉर्म पुढील संकेतस्थळावर उपलब्ध आहे. – https://forms.gle/DdAc७gJUXQwkqdPd६
तसेच प्रवेश अर्ज १ ते १५ डिसेंबरपर्यंत विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहे. या कोर्सचा अभ्यासक्रम विद्यापीठाच्या क्रीडा विभागाच्या http://unipunedpe.in/ आणि https://ggim.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे.

प्रवेशप्रक्रियेसाठी स्वतंत्र मदत क्रमांक
प्रवेश प्रक्रियेसाठी कोणाही इच्छुकाला कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास त्यासाठी जीजीआयएम च्या कार्यालयाशी संपर्क साधावा त्यासाठी क्रमांक पुढीलप्रमाणे - ९८२२३२३१४७ , ९७६९३०२९३४, ८९७५३९८८८६

प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची माहिती

  • कालावधी : ३ महिने
  • एकूण सत्र (सेमिस्टर) : १
  • एकूण क्रेडिट्स : १२
  • शिकवण्याची पद्धत : ऑनलाइन आणि ऑफलाइन
  • शैक्षणिक तास (थेअरी) : सोमवार ते शुक्रवार (ऑनलाइन)
  • शैक्षणिक तास (प्रात्यक्षिक) : सात दिवसांचा सह्याद्री अभ्यासवर्ग (ऑफलाइन)
  • प्रवेश पात्रता : १८ ते ६०
  • शिक्षण : किमान १२ वीपर्यंत
  • शारीरिक क्षमता : वैद्यकीयदृष्ट्या सक्षम

Related posts

अकरावीच्या ९९ हजार जागा रिक्त; २ लाख ७४ हजार विद्यार्थ्यांनी घेतले प्रवेश

Voice of Eastern

कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या नोटीसीची दखल घेत नायर दंत वैद्यकीय महाविद्यालयाने केल्या मागण्या मान्य

गणरायाच्या सजावटीसाठी शाळावर्गाची हुबेहूब प्रतिकृती! ; डी. एस. हायस्कुलच्या माजी विद्यार्थ्याची कल्पकता

Voice of Eastern

Leave a Comment