Voice of Eastern

मुंबई :

क्षयरुग्णांना आणि श्वसनाशी संबंधित विकारांमधून सावरण्यासाठी रुग्णांना उपचार पुरविण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कांदिवलीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापालिका रुग्णालयात ‘फुप्फुस पुनर्वसन केंद्र’ सुरु केले आहे. यापूर्वी शिवडीतील क्षयरोग रुग्णालयात पहिले फुप्फुस पुनर्वसन केंद्र सुरू केले होते.

कांदिवलीतील ‘फुप्फुस पुनर्वसन केंद्रा’चे अनावरण महापालिकेच्या प्रमुख वैद्यकीय अधीक्षक डॉ. विद्या ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. मुंबई महापालिकेचा सार्वजनिक आरोग्य विभागाकडून सर्वंकष व सर्वोत्कृष्ट आरोग्य सुविधा दिल्या जातात. शिवडीतील क्षयरोग उपचार रुग्णालयात मुंबईतील पहिले ‘फुप्फुस पुनर्वसन केंद्र’ २२ डिसेंबर २०२१ रोजी सुरु केल्यानंतर आता कांदिवलीत हे केंद्र सुरु केल्याने रुग्णांची मोठी सोय होणार आहे. सिप्ला फाऊंडेशनने या फुप्फुस पुनर्वसन केंद्राला संयंत्र पुरवले आहेत. क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमातून उपनगरीय रुग्णालयांमध्ये शक्य तिथे क्षयरुग्णांना उपचारांच्या सुविधा पुरविल्या जातील, असे डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.

कांदिवलीतील ‘फुप्फुस पुनर्वसन केंद्र’ हे सकाळी ९ ते दुपारी ४ दरम्यान सुरु राहणार आहे. या केंद्राद्वारे श्वसनाशी संबंधित सर्व विकारांसाठी आवश्यक पुनर्वसन उपचार विनामूल्य देण्यात येणार आहे. यामध्ये फॉलो-अपसाठी येणार्‍या रुग्णांसह क्षयरोगातून बरे झालेले रुग्ण, गंभीर स्वरुपाच्या फुप्फुस आजाराचे रुग्ण, दमा, सूक्ष्म श्वसनलिकेचे रुग्ण, फुप्फुसांना भेगा पडल्याने त्रस्त झालेले रुग्ण, कोविडमधून बरे झालेले रुग्ण अशा विविध प्रकारच्या रुग्णांना फुप्फुस पुनर्वसनाशी संबंधित उपचार घेता येणार आहेत.

Related posts

रायगडच्या अतिदुर्गम भागातील पडवी पठार गावातील मुलीची सुवर्ण कामगिरी

Voice of Eastern

युवा उद्योजिकेने ’नारिओ’च्या माध्यमातून दिले गृहिणीच्या स्वप्नांना पंख

मुंबई सोडून जाऊ नका आदित्य ठाकरेंचे विक्रोळीकरांना भावनिक आवाहन

Leave a Comment